सूरज चव्हण 29 नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकला.
सूरजने बायकोसोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओत संजना सूरजला प्रपोज करताना दिसत आहे.
'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणला 2025 खूप खास ठरले. यावर्षी त्याचा पहिला चित्रपट 'झापुक झुपूक' प्रेक्षकांच्या भेटीला आला. सूरजवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले. त्यानंतर सूरज चव्हाणने आपल्या नवीन घरात गृहप्रवेश केला. त्याच्या आलिशान बंगल्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. आता वर्षाच्या शेवटी सूरज आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न बंधनात अडकला. सूरजने चुलत मामाच्या मुलीसोबत (संजना) लग्नगाठ बांधली. चाहत्यांनी त्यांना भरभरून प्रेम दिले.
View this post on Instagram
सूरज चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याची बायको संजना त्याला प्रपोज करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहून शकता की, संजना लाजत लाजत गुलाबाचे फुल देऊन सूरजला प्रपोज करते. ती म्हणते की, "अहो! आय लव्ह यू" तिचा हा रोमँटिक अंदाज पाहून सूरज घायाळ होतो. त्याला खूप आनंद होतो आणि तो देखील लाजतो. तो म्हणतो की, "किती भारी बोलली. मला खूप आनंद होतोय. मी आज पहिल्यांदा इतका खुश झालो आहे..." या खास व्हिडीओला 'मला वेड लागले प्रेमाचे' हे गाणं लावलं आहे.
सूरज चव्हाणच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते सूरज-संजनचा रोमँटिक अंदाज पाहून चाहते भारावून गेले आहेत. संजनानेगुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली आहे. तर सूरज शर्ट पॅन्टमध्ये दिसत आहे. दोघे एकत्र खूपच खुश आहेत. व्हिडीओला खूप हटके कॅप्शन देण्यात आले आहे. तिने लिहिलं की, "कसा आहे मग माझ्या बायकोचा प्रपोज..."
View this post on Instagram
सूरजच्या व्हिडीओवर "लाजला बघ, हसला बघ, अग बया ग, सुरज भाऊ...", "एवढा खुश झाला आभाळ पेटलं...", "आपला लाडका सुरज भाऊ आणि संजना", असंच हसत आनंदी राहा.. सुरज दादा देव करो सर्व सुख तुझ्या नशिबात देऊ" चाहते अशा कमेंट्स करत आहेत. सूरज चव्हाणच्या लग्न सोहळ्यात हळदीपासून ते लग्नापर्यंत सर्व समारंभ थाटामाटात पार पडले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Marathi Actress : ॲक्शन सीन करताना मालिकेच्या नायिकेला दुखापत; नाकावर पट्टी लावून करतेय शूटिंग, पाहा VIDEO