महागुरु सचिन पिळगावकर यांनी अक्षय खन्नाच्या व्हायरल गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या लग्नाला 4O वर्ष झाली.
सचिन पिळगावकर कायम आपल्या वक्त्यामुळे चर्चेत असतात.
महागुरु सचिन पिळगावकर सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांचे किस्से आणि विधाने कायम व्हायरल होत राहतात. मात्र सचिन पिळगावकर एख उत्तम अभिनेते आहेत. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची भरपूर मने जिंकली आहेत. नुकतेच त्यांच्या लग्नाला 40 वर्ष पूर्ण झाली आहे. लेक श्रियाने एक खास व्हिडीओ शेअर करून आई-बाबांना शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
श्रिया पिळगावकरने सचिनआणि सुप्रियाचा भन्नाट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात सचिन-सुप्रिया 'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या व्हायरल गाण्यावर (fa9la song) भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्यांनी केलेल्या हुक स्टेपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच डान्सचे कौतुक केले आहे. मात्र काही नेटकऱ्यांनी सचिन पिळगावकर यांची खिल्ली देखील उडवली आहे.
श्रिया पिळगावकर कॅप्शन"हीच तर केमिस्ट्री! ४० वर्षांचे प्रेम, हास्य, गोष्ट, प्रगती, पार्टनरशिप आणि तो वेडेपणा कधीही कमी होऊ दिला नाही. पडद्यावर आणि पडद्यामागील सुंदर गोष्टींसाठी आणि या सगळ्यात दररोज एकमेकांना निवडल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. तुम्ही प्रत्येक बाबतीत आदर्श आहात. लव्ह यू...हॅपी ॲनिव्हर्सरी..."
View this post on Instagram
सचिन पिळगावकर यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. काही लोक त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहे. तर काही लोक त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहे. एका युजरने लिहिलं की, "ही डान्स स्टेप अक्षय खन्नाला सचिनजीनी शिकवलीय...", तर दुसरा युजरने लिहिलं," साक्षात प्रत्यक्ष महागुरू उर्दू मध्ये नाचताना..." तर बाकी नेटकरी म्हणतात की, "महागुरुना स्वप्न उर्दूमध्ये पडते ऐकले होते हे तर चक्क डान्स पण उर्दू मध्ये करतात", "'धुरंधर'ची कथा महागुरुनी लिहीलेली होती पण अक्षय खन्ना कडे डेट नव्हत्या म्हणून..."
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया यांनी 21 डिसेंबर 1985 मध्ये लग्नगाठ बांधली. 'नवरा माझा नवसाचा', 'आयत्या घरात घरोबा', 'अशी ही बनवाबनवी',' आम्ही सातपुते', 'नवरी मिळे नवऱ्याला' अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.
Suraj Chavan : काळी साडी, हलव्याचे दागिने सूरज चव्हाणच्या बायकोचा थाट न्यारा; लग्नानंतरच्या पहिल्या सणाची तयारी सुरू, VIDEO होताय व्हायरल