Healthy Breakfast Recipe: तुम्हाला जर दररोज एकाच प्रकारचा नाश्ताय करुन कंटाळा आला असेल तर तुम्हाला काहीतरी हेल्दी हवे असेल तर तुम्ही मसालेदार मुगाची चाट बनवू शकता. त्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. हा पदार्थ बनवायला सोपा आणि प्रथिनेयुक्तआहे. जर तुमच्या मुलांना मुग खायला आवडत नसेल तर चाट बनवून देऊ शकता. (protein rich breakfast recipe with moong)
मूग चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्यसंपूर्ण मूग डाळ
डाळिंबाच्या बीया
स्वीट कॉर्न
शेंगदाण्याचे दाणे
काजू
चिरलेला कांदा
चिरलेला टोमॅटो
लिंबू
काळे मीठ
बारिक चिरलेली कोथिंबीर
काळी मिरी
मूग चाट बनवण्याची कृतीरात्रभर मूग भिजत ठेवा. सकळी कुकरमध्ये शिजवा. नंतर पाणी काढून टाका. आता एका पॅनमध्ये तूप किंवा तेला टाका. त्यात जिरे घाला. नंतर मूग फ्राय करा. नंतर मीठ, तिखट टाका. फ्राय केलेली मूगवर बारीक चिरलेला कांदा, तुम्ही भुजिया शेव, वाफवलेला बटाट देखील टाकू शकता. तसेच यात हिरवी चटणी आणि आंबट-गोड चटणी देखील टाकू शकता. प्रोटीनयुक्त हा नाश्ता लहान मुले देखील आवडीने खातील.