Uddhav Thackeray Shiv Sena- Raj Thackeray MNS Announce Political Alliance: राज्याच्या राजकारणातील बहुचर्चित उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. वरळीतील 'हॉटेल ब्लू सी'मध्ये आज बुधवारी (दि. २४ डिसेंबर) झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी युतीची अधिकृत घोषणा केली. पण त्यांनी जागावाटपावर बोलण्यास नकार दिला. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election) निवडणुकीदरम्यान त्यांची ही युती महत्त्वाची मानली जात आहे.
आम्ही एकत्र आले आहोत ते एकत्र राहण्यासाठी, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. ''मुंबई आणि महाराष्ट्राकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले आणि मुंबईला मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही,'' असा इशारा त्यांनी दिला.
Maharashtra Politics: निवडणूक आयोग इतके दिवस झोपला होता का?तुटू नका, फूटू नका, मराठीचा वसा टाकू नका, असे आवाहनही त्यांनी केले. आमची नाशिकमध्ये युती झाली आहे. बाकीच्या महानगरपालिकांमध्येही आता शिक्कामोर्तब होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Devendra Fadnavis: शिंदेंसोबत जास्तीत जास्त ठिकाणी युती, पुण्यात अजितदादांविरोधात लढू, फडणवीस काय म्हणाले?राज ठाकरे म्हणाले की, कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोण किती जागा लढवणार?, हे आम्ही सांगणार नाही. महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळवण्याच्या खूप टोळ्या फिरत आहेत. ते राजकीय पक्षांमधील पोरं पळवतात. त्यात आता दोन टोळ्या जास्त सामील झाल्या आहेत. जे निवडणुका लढवणार आहेत, त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. बरेच दिवस महाराष्ट्र ज्याची प्रतीक्षा करत आहे, त्या शिवसेना- मनसे यांची युती झाली हे आम्ही आज जाहीर करत आहोत.
विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत, ठाकरे बंधूंच्या सोबत खासदार संजय राऊत यांच्यासाठी खास खूर्ची ठेवली होती. तिघे एकत्र बसले होते. आज पुन्हा मराठी ऐक्याचा मंगल कलश घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. हाच मंगल कलश मुंबईसह इतर महानगरपालिकांमध्ये भगवा ध्वज फडकावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
आज युतीच्या घोषणेआधी दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी दोन्ही बंधूंनी सहकुटुंब एकत्र जाऊन अभिवादन केले.
मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधू सुमारे २० वर्षानंतर एकत्र आले. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. पण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीमुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे.