Satara Crime: वृद्धेला लुटणाऱ्या टोळीतील एकास अटक; सातारा पोलिसांची कारवाई; सोन्याच्या बिस्किटांचे आमिष..
esakal December 25, 2025 06:45 AM

सातारा : सोन्याची बिस्किटे देण्याचे आमिष दाखवून वृद्ध महिलांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीतील एकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन गुन्ह्यांतील साडेचार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गणेश विनायक गायकवाड (वय ३६, रा. भालगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?

शहर परिसरामध्ये वृद्ध महिलांना बनावट सोन्याचे बिस्कीट देत त्यांचे दागिने लुटण्याचे प्रकार सुरू होते. अशा प्रकारचे तीन गुन्हे शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर या संशयितांना तातडीने अटक करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मस्के यांना दिले होते. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयितांचा शोध सुरू केला होता.

चार- पाच महिन्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पोलिसांनी अहिल्यानगरमधील गायकवाड याचा गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस त्याच्यावर पाळत ठेवून होते. तो १८ डिसेंबरला त्याच्या गावी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे सापळा लावला. त्यामध्ये शेतातील झाडीत लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या गायकवाडला पकडण्यात आले. तपासामध्ये त्याने सातारा शहरात तीन गुन्हे केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात चोरलेले सुमारे साडेचार लाख रुपयांचे दागिने व बनावट सोन्याची बिस्किटे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक श्री. मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, सतीश मोरे, सुनील मोहिते, नीलेश यादव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम व सुहास कदम या कारवाईत सहभागी होते.

MPSC Success Story : साताऱ्यातील कामगाराचा मुलगा बनला 'क्लास वन' अधिकारी; वैभवने हलाखीच्या परिस्थितीवर मात करत गाठले यशाचे शिखर ! २५ सीसीटीव्हींची तपासणी

फसवल्या गेलेल्या महिला या वृद्ध होत्या. त्यामुळे संशयितांचे योग्य वर्णन मिळण्यात अडचणी होत होत्या. त्यासाठी पोलिसांनी सुमारे २५ सीसीटीव्हींची पाहणी केली. तपासादरम्यान अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळ्या लातूर व अहिल्यानगर जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन तपासणी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.