सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी नागरिक विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या इच्छुकांना नागरिक विकास आघाडीमार्फत अर्ज भरावयाचा आहे,
त्यांनी कामगार भवन, नवरत्न हॉटेलच्या माडीवर रत्नाकर गोंधळे यांच्याकडे ठेवलेले छापील अर्ज भरून सादर करावेत, असे अॅड. अजितराव सूर्यवंशी यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘‘अर्जासोबत आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची माहिती अर्ज स्वीकारताना दिली जाईल.
Kolhapur Muncipal Corporation : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये तिकीटासाठी चुरस; ३०० हून अधिक इच्छुकांच्या मुलाखतीइच्छुक उमेदवार कोणत्याही पक्षाशी संबंधित असले तरी, निवडणूक जिंकल्यानंतर महापालिकेत कार्यरत असताना पुढील पाच वर्षे नागरिक विकास आघाडीशी निष्ठावंत राहणे, आघाडीचा जाहीरनामा मान्य करणे तसेच जनतेशी प्रामाणिक राहून त्यांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी पूर्णवेळ प्रयत्न करणे आवश्यक राहील. यासाठी लेखी हमीपत्र देणे बंधनकारक असेल.’’
इच्छुक उमेदवारांनी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन अॅड. अजितराव सूर्यवंशी, प्रा. बाळासाहेब मासुळे, वि. द. बर्वे, डॉ. जयपाल चौगुले, प्रेमचंद पंड्याजी व प्राचार्य एस. के. पाटील यांनी केले आहे.
Kolhapur Muncipal Corporation : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये तिकीटासाठी चुरस; ३०० हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती