Video : रोहित शर्माला पाहण्यासाठी जयपूरमध्ये झुंबड! गौतम गंभीर, पाहतोस ना? ते रोहित भाई को बॉलिंग दो... प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
esakal December 25, 2025 06:45 AM

Over 10,000 Fans Flock to Vijay Hazare Trophy Game: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याची एक झलक पाहण्यासाठी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर १० हजारांहून अधिक प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. रोहित व विराट कोहली हे दोन सुपरस्टार विजय हजारे ट्रॉफीत खेळणार असल्याचे जाहीर झाल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. दिल्लीकडून विराट १० वर्षांनी विजय हजारे ट्रॉफीत खेळायला उतरला, परंतु हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी नाही. तेच रोहितचा खेळ पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांनी गौतम गंभीर हे पाहतोस ना? असा सवाल टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाला केला.

रोहितने मागच्या वर्षी वर्ल्ड कप विजयानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर या वर्षी मे महिन्यात कसोटीतून त्याने निवृत्ती जाहीर केली. रोहित व विराट हे फक्त भारतासाठी वन डे फॉरमॅट खेळतात. त्यामुळे त्यांना मॅच फिटनेस राखण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे महत्त्वाचे आहे. बीसीसीआयने तसा भारतीय खेळाडूंसाठी नियमच केला आहे. त्यामुळेच यंदाच्याविजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघातील अनेक स्टार खेळताना दिसत आहेत.

Vaibhav Suryavanshi: ३१ चेंडूंत १५४ धावा! वैभवचा वर्ल्ड रेकॉर्ड; एबी डिव्हिलियर्सचा सर्वात मोठा विक्रम मोडला, पहिला भारतीय ठरला

शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाकडून ७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत खेळणाऱ्या रोहितला पाहण्यासाठी जयपूर सवाई मानसिंग स्टेडियमवर तुफान गर्दी जमली होती. या सामन्याचे चॅनेलवर थेट प्रक्षेपण होणार नसल्याने प्रेक्षकांनी स्टेडियमवर मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. जवळपास १० हजारांहून अधिक प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी आले होते आणि उपस्थितांच्या माहितीनुसार ५ हजार प्रेक्षक अजूनही स्टेडियमबाहेर उभे होते.

यावेळी प्रेक्षकांनी गौतम गंभीर पाहतोस ना? पासून ते मुंबईचा राजा रोहित शर्मा अन् रोहित भाई को बॉलिंग दो अशी नारेबाजी केली.

२०१८ नंतर पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत स्पर्धेत १८ सामने खेळले आहेत. त्या १८ सामन्यांपैकी १७ डावांमध्ये रोहित शर्माने ३८.७ च्या सरासरीने ५८१ धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत

Vijay Hazare Trophy : रोहित शर्माच्या सुरक्षेत मोठी चूक; बॉडिगार्डना चकवून 'तो' हिटमॅनजवळ पोहोचला अन्... माजी कर्णधार चिडला Video
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.