ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाला पुन्हा एकदा एशेज कसोटी मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मागच्या 13-14 वर्षांपासून असंच घडत आहे. एवढ्या वर्षात मालिका सोडा कसोटी सामनाही जिंकता आलेला नाही. मेलबर्नमध्ये चौथा कसोटी सामना अर्थात बॉक्सिंग डे 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लंडने प्लेइंग 11 जाहीर केली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात घातली असली तरी प्लेइंग 11 काय जाहीर केली नाही. उलट 12 खेळाडूंची नावं जाहीर करून संभ्रमात टाकलं आहे. नाणेफेकीच्या वेळी एका खेळाडूला बेंचवर बसवलं जाईल. दरम्यान या सामन्यात कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स खेळणार नाही. तर फिरकीपटून नाथन लायन दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या सामन्यासाठी दोन खेळाडू बदलणं भाग पडलं.
ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिलं आहे. पहिला कसोटी सामना खेळणारा वेगवान गोलंदाज मायकल नीसर आणि ब्रँडन डॉगेट यांना संघात स्थान दिलं आहे. पण यातही एक नाव खूपच खास आहे. कारण जवळपास चार वर्षांनी या गोलंदाजाने संघात स्थान मिळवलं आहे. 29 वर्षीय वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन याला 12 खेळाडूंच्या संघात स्थान मिळालं आहे. रिचर्डसनने ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा कसोटी सामना 2021 मध्ये खेळला होता. हा देखील एशेज कसोटी सामना होता. रिचर्डसनने 3 कसोटीत 11 विकेट नावावर केल्या आहेत.
चार वर्षानंतर रिचर्डसनला संधी मिळाल्याने तो प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही. पण 11 व्या खेळाडूसाठी मायकल नीसर आणि ब्रँडन डॉगेट यांच्यात चुरस असेल. यापैकी एकाची निवड संघात होईल. दोघांनी दुसऱ्या कसोटीत भाग घेतला होता. पण दोघांची संघातील जागा पक्की नाही. एकंदरीत सध्याचं चित्र पाहता मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलँड मुख्य वेगवान गोलंदाज असतील. तर झाय रिचर्डसनसोबत नीसर किंवा डॉगेट यापैकी एकाचा समावेश होईल.
ऑस्ट्रेलियाचा संघ : स्टीव स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जेक विदरॅल्ड, मार्नस लाबुशेन, उस्मान ख्वाजा, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मिचेल स्टार्क, झाय रिचर्डसन, स्कॉट बोलँड, मायकल नीसर आणि ब्रँडन डॉगेट