राज्यात थंडीची लाट काहीशी कमी, पण गारठा कायम
धुळे ७°, निफाड ७.३°, परभणी ७.२° सर्वात कमी तापमान
किमान तापमानात किंचित वाढीची शक्यता IMDचा अंदाज
हवामानातील सतत बदलांमुळे नागरिक संतप्त
महाराष्ट्रात थंडीची लाट काहीशी कमी झाली असली, तरी हुडहुडी कायम आहे. राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहेत. आज किमान तापमानात वाढ होण्याची, मात्र गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सतत बदलत जाणाऱ्या हवामानामुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळतो आहे.
बुधवारी धुळे येथे ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे ७.३ अंश सेल्सिअस. परभणी येथे ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, जेऊर येथे ९ अंश, तर अहिल्यानगर, जळगाव, पुणे, मालेगाव, नाशिक आणि गोंदिया येथे १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.
Shocking : पुण्यातून निवडणूक निकालसाठी गावाकडे गेला अन् खून झाला, चाकू-काठीने बेदम मारलं, लातूरमधील धक्कादायक घटनाकाल म्हणजेच बुधवारी निफाड, धुळे, परभणी येथे थंडीची लाट होती. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली असली तरी गारठा कायम होता. राज्यातील लाट काहीशी ओसरली असली तरी थंडी कायम राहणार आहे. आज किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याचा अंदाज आहे. तर कमाल तापमानातील चढ -उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Shocking : बिर्याणीत मीठ जास्त झाल्याने इंजिनीअर नवरा भडकला; भिंतीवर डोकं आपटून बायकोला संपवलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार परभणीत ३६ वर्षात पहिल्यांदा गारठ्याचे प्रमाण जास्तपरभणी जिल्ह्यात यंदा डिसेंबर २०२५ हा महिना आजपर्यंतचा सर्वात थंड महिना म्हणुन नोंद झाली. कारण मागच्या महिना भरापासून तापमान हे १० अंशाखाली गेले आहे.सातत्याने तापमान कधी सात कधी सहा तर कधी ५ अंशापर्यंत कमी झाल्याने, परभणी म्हणजे अक्षरशः थंड प्रदेश असल्यासारखे वातावरण झाले आहे.परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने उपलब्ध असलेल्या १९८९ पासूनचा डाटा तपासला असून यात यंदाचा डिसेंबर महिना हा सर्वाधिक थंड असल्याची नोंदं करण्यात आली.३६ वर्षात पहिल्यांदा असे झाले आहे.
Dhule : धुळे महापालिकेत महायुतीचा तिढा कायम! ७४ जागांसाठी रणसंग्राम, भाजपचा ५५ प्लसचा नारा, शिवसेना २१ जागांवर ठाम राज्यात कसं आहे हवामान?पुणे : ९.९
अहिल्यानगर : ९.३
धुळे : ७.०
जळगाव : ९.७
जेऊर : ९.०
कोल्हापूर : १५.३
महाबळेश्वर : १२.०
नाशिक : ९.५
निफाड : ७.३
रत्नागिरी : १७.१
छत्रपती संभाजीनगर : १२.४
परभणी : ११.०