'विझलो जरी मी...', पोस्ट ठरली अखेरची, नगराध्यक्षपदाची निवडणूक लढलेल्या मनसे नेत्याचा अपघाती मृत्यू
esakal December 26, 2025 03:45 AM

वाशिममध्ये नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढलेल्या मनसेच्या नेत्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलीय. भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभवानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून मतदारांचं आभारही त्यांनी मानलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा अपघाती मृत्यू झालाय.

मनसेचे शहर पदाधिकारी हरीश हेडा यांच्या दुचाकीला वाशिममध्ये अपघात झाला. दुचाकीवरून जाताना वाशिमच्या कारंजा वाशिम बायपास जवळ एका भरधाव पिकअपने धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की यात हरीश हेडा गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी नेण्याआधीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

राज-उद्धव यांची युती!

हरीश हेडा यांनी कांरजा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत हरीश हेडा यांना पराभवाचा धक्का बसला होता. पराभवानंतरही हरीश हेडा पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले होते. पराभवानंतर मतदारांचे आभार मानणारी पोस्टही सोशल मीडियावर केली होती. विझलो जरी मी, हा माझा अंत नाही ही त्यांची शेवटची पोस्ट ठरली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.