Christmas 2025: सँटा क्लॉजचा शोध कोणी लावला?
esakal December 26, 2025 03:45 AM

Who Invented Santa Claus

सांता क्लॉज कोणी शोधला?

आज आपण ओळखतो तो सँटा क्लॉज एका व्यक्तीने “शोधलेला” नसून, तो शतकानुशतके घडत गेलेल्या कथांचा परिणाम आहे.

Big Role Played By Coca Cola

कोका-कोलाची मोठी भूमिका

1931 मध्ये कोका-कोलाने कलाकार हॅडन सँडब्लोम यांना जाहिरातीसाठी सँटा क्लॉजचं चित्र तयार करण्याचं काम दिलं.

Today's Well Known Santa

आजचा ओळखीचा सँटा

लाल वस्त्र, पांढरी दाढी, गुलाबी गाल आणि हसरा चेहरा; सँडब्लोमच्या चित्रांमुळेच आजचा आधुनिक सँटा प्रसिद्ध झाला आहे.

Story of Santa Claus

मात्र सँटा यापेक्षा खूप जुना आहे

सँटा क्लॉजची मुळं इ.स. 280 च्या सुमारास जगलेल्या सेंट निकोलस या साधूशी जोडली जातात.

Who Was Saint Nicolas

सेंट निकोलस कोण होते?

सेंट निकोलस हे सध्याच्या तुर्कीतील लायसिया भागात राहणारे दयाळू साधू होते, जे गरिबांना आणि आजारी लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध होते.

Saint Who Protect Kids

मुलांचे संरक्षक संत

त्यांच्या उदार स्वभावामुळे कॅथोलिक चर्चने सेंट निकोलस यांना मुलांचा संरक्षक संत घोषित केलं.

Netherland's Sinterklass's Tradition

नेदरलँड्समधील ‘सिंटरक्लास’ परंपरा

नेदरलँड्समध्ये सेंट निकोलसला ‘सिंटरक्लास’ म्हणतात. 5 डिसेंबरच्या रात्री मुलं बूट बाहेर ठेवतात, ज्यात सकाळी भेटवस्तू आणि गोड पदार्थ मिळतात — इथूनच ‘Santa Claus’ हे नाव रूढ झालं.

first Christmas celebration

जगातील पहिला ख्रिसमस कुठे साजरा झाला? जाणून घ्या रंजक इतिहास आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.