Mahapalika Elections : भाजप म्हणतंय पाठीत खंजीर खुपसला, शिवसैनिक म्हणाला स्वबळावर होऊन जाऊ द्या, कल्याणमध्ये नेमकं काय सुरू?
Saam TV December 26, 2025 03:45 AM

संघर्ष गांगुर्डे, प्रतिनिधी साम टीव्ही

Mahayuti internal conflict ahead of municipal elections : महापालिका निवडणुकीसाठी राज्यात जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच महायुतीमधील अंतर्गत मतभेद, वाद चव्हाट्यावर आलाय. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप करत युतीच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर त्याला शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी सडेतोड शब्दात प्रत्युत्तर देत थेट इशाराच दिला आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीमध्ये अंतर्गत वादाचा नवा अंक सुरू झालाय.

पाठीत खंजीर खुपसला -

भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील म्हणाले की, २०२४ मध्ये भाजपच्या सुलभा गायकवाड यांच्या विरोधात शिवसेनेने महेश गायकवाड यांना बंडखोर म्हणून उभे केले. त्यांना मिळालेली ५४ हजार मते कुठून आली? ती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या मदतीमुळेच आली आहेत. चार महिन्यांनंतर त्यांना पुन्हा पक्षात घेतले गेले. युतीत असे चालत नाही. आम्ही कुठे तरी चुकलो असू, पण आम्ही कधीच पाठीत खंजीर खुपसलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.

Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरूवारपासून सेवेत, बंगळूरूहून येणार पहिलं विमान, वाचा सविस्तर काही लोकांचे विचार बदलले -

या टीकेला उत्तर देताना शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी भाजपवरच पलटवार केला. खरी युती ही बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांची होती. आज काही लोकांनी विचार बदलले आहेत. आम्ही नेहमीच प्रामाणिकपणे युतीचे काम केले आहे. खासदार शिंदे यांच्या निवडणुकीत भाजपचे काही आमदार विरोधी पक्षाच्या उमेदवारांसोबत गळाभेट करत होते,असा आरोप त्यांनी केला.

भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणतात की शिवसेनेनेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. मात्र आमच्या नेत्यांचा वेळोवेळी अपमान करणे त्यांनी थांबवावे. विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी मला उभे केले असते तर मला ५५ हजार नव्हे तर १ लाख १० हजार मते मिळाली असती. आणि मी आमदार असतो, असे महेश गायकवाड म्हणाले.

Thackeray Brothers : 'ठाकरें'च्या एकजुटीनं समीकरणं बदलणार! महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार? ६ मुद्द्यांत समजून घ्या स्वबळावर होऊन जाऊ द्या -

कल्याणपूर्वेत भाजपचा एक नगरसेवक निवडून येणे कठीण होते. युतीमुळेच तो निवडून आला. आमची ताकद दाखविण्याची वेळ आणू नये. उगाच वल्गना करू नयेत. स्वबळावर एकदा होऊनच जाऊ द्या. विधानसभेत शिवसेनेचा एक मावळा भारी पडला सगळे एकवटले तर तुमचा सुपडा साफ होईल,असा थेट इशाराच गायकवाड यांनी दिला. दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे कल्याण पूर्वेत महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीतील तणाव अधिक वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Raj Thackeray : महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी, राज ठाकरेंनी भाजपचा शेलक्या शब्दात घेतला समाचार, वाचा नेमकं काय म्हणाले
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.