इचलकरंजी : इचलकरंजीतील बहुतांश रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. विशेषतः मुख्य मार्ग फेरीवाल्यांच्या मालकीचाच झाला आहे. त्यातून वाहनचालकांना मार्ग शोधताना तारेवरची कसरत करावी लागते.
आठवडा बाजाराची सुविधा असताना रस्त्याच्या दुतर्फा बाजार आता दररोज भरत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सतत होत आहे. शहरात यापूर्वीच नो हॉकर्स झोन केले आहेत; पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही.
Naigaon Traffic Issue : बेशिस्त वाहनांमुळे रुग्णवाहिकांची कोंडी! नायगाव शहरात रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतूक होते ठप्पयापूर्वी अनेकवेळा फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाला शिस्त लावण्याचा प्रयत्न झाला. पण, एक-दोन दिवसांनंतर पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती तयार होते. राजकीय पाठबळावर रात्रीत विनापरवाना टपरी उभारण्यात येते. पण, ठोस कारवाई होत नाही. एकूणच फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाला महापालिका सभागृह अस्तित्वात आल्यावर तरी शिस्त लावली जाईल, अशी अपेक्षा आहे.
- पंडित कोंडेकर
इचलकरंजी महापालिका झाल्यानंतर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर अंकुश येईल, अशी आशा होती. पण, सध्या फेरफटका मारला तर तसे फारसे समाधानकारक चित्र दिसत नाही. प्रशासक राजवटीत सुरुवातीला शिस्त लावण्याचा प्रयत्न झाला.
Kolhapur Roads : कोट्यवधींचा निधी, पण रस्ते मात्र खड्ड्यांचेच; कोल्हापूरकरांचा संताप अनावरपण, राजकीय हस्तक्षेप आडवा आला. त्यामुळे आजही शहरातील मुख्य मार्गावर अतिक्रणाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. मुळात फिरून साहित्य विक्री करण्यासाठी महापालिकेकडून फेरीवाल्यांना परवाना दिला जातो. प्रत्यक्षात मात्र बहुतांश फेरीवाल्यांनी आपल्या जागेची मालकी पक्की केली आहे.
शहरात नोंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या हजारपेक्षाही कमी आहे. प्रत्यक्षात मात्र तिप्पट ते चौपट फेरीवाले शहरात आज आहेत. मुळात शहरातील रस्ते अरुंद आहेत. त्यातच फेरीवाले आपल्या सोयीने उभे असतात.
त्यांच्याकडे आलेल्या ग्राहकांची वाहने कुठेही व कशीही पार्किंग केलेली असतात. त्यामुळे या गर्दीतून पुढे जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला अधूनमधून जाग येते. दोन-चार टपऱ्या जप्त केल्या जातात. दंडात्मक कारवाईनंतर त्या परत केल्या जातात. पुन्हा आहे त्या जागेवर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी टपरी दिसते.
महापालिका झाल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथक अधिक सक्षम करणे आवश्यक होते. पण, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अतिक्रमण काढताना कधी तरी उपायुक्त दर्जाचे अधिकारी रस्त्यावर उतरताना दिसतात.
सर्वसाधारणपणे किमान आठवड्यातून एक दिवस तरी फेरीवाल्यांचे अतिक्रमण दूर करावे व मुख्य मार्ग वाहतुकीला खुले ठेवावेत, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. अलीकडे विविध सणांच्या निमित्ताने मुख्य मार्गावरच बाजार भरत आहे. त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते. त्यावरही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कधी ना कधी तरी याबाबत गांभीर्याने घ्यावे
लागणार आहे.
अनेक व्यावसायिक नियमाने व्यवसाय करीत असतात. दुकान गाळे भाड्याने घेतात. त्यांच्याच दुकान गाळ्यांसमोर फेरीवाले महापालिकेची नाममात्र भूभाडे शुल्क आकारून अधिक जोमाने व्यवसाय करीत असतात.
अशी विचित्र परिस्थिती येथे दिसून येते. सध्या महापालिकेत पथविक्रेता समिती कार्यान्वीत करण्यात आली आहे. यामध्ये शासकीय अधिकारी व फेरीवाल्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत. पण, अद्याप या समितीचे फारसे अस्तित्व दिसले नाही. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबाबत नवीन येणाऱ्या महापालिकेच्या पहिल्या सभागृहात ठोस धोरण ठरवले जावे, अशी
अपेक्षा आहे.
पदपथावर अतिक्रमण असल्याने लोक रस्त्यावरून चालतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अतिक्रमण निर्मूलन पथकाला हे दिसत नाही काय? त्यांना कशासाठी पगार दिला जातो, असा प्रश्न उपस्थित होतो. अतिक्रमणमुक्त प्रभाग ठेवण्याची हमी देणाऱ्या उमेदवारांचाच मतदारांनीही विचार करण्याची गरज आहे.
- कौशिक मराठे
शहरात सर्वत्रच अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न दिसत आहे. नगपालिकेचे मुख्याधिकारी जाऊन महापालिकेचे आयुक्त आले. पण, अतिक्रमणाचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. रस्त्यावर ठाण मांडून बसलेले विक्रेते, बंद पडलेली वाहने, गटारीच्या पुढे व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
- राजू आरगे
अतिक्रमणाबाबत मी अनेकवेळा महापालिकेकडे लेखी तक्रार केली होती. पण, त्याबाबत पुढे कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याचा माझा अनुभव आहे. प्रशासनाकडून तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते. नागरिकांच्यादृष्टीने ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. केवळ बारनिशीमध्ये तक्रार घेतात. पण, त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही.
- अरुण दत्तवाडे