कोल्हापूर : मित्र पक्षांना सोबत घेऊन जायचे, प्रभागातील आरक्षण पाहायचे, एखाद्या जागेसाठी अडून बसलेल्याला सांभाळायचे, नवीन पर्याय काढायचा, अशा पद्धतीने अनेक पक्षांचे जागा वाटप, उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जागा वाटप, आरक्षण व ताकद यांचा विचार करून अनेक प्रभागांत आपापल्या मित्रपक्षांनी उमेदवारांच्या अदलाबदलीला सुरुवात केली आहे.
संधीच जाण्यापेक्षा मोठ्या पाठबळावर निवडून येण्याच्या संधीचा विचार करून उमेदवारांनाही पक्षांच्या नवीन ‘फॉर्म्युला’ला संमती द्यावी लागत आहे. त्यामुळे सर्वसाधारणची तयारी केलेल्यांना महिला आरक्षणातून किंवा प्रभाग बदलण्याचीही तयारी केली आहे.
Kolhapur Muncipal Election : दहा वर्षांनंतर निवडणुकीची संधी; प्रभागातील गणित बदलणार, पक्षांतर्गत ताकद जोखण्यास सुरुवात!दहा वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने प्रत्येक भागातून इच्छुकांनी तयारी केली आहे. अनेकांनी मतांची पाकिटे जमवली आहेत. यामुळे प्रत्येक पक्षातील इच्छुकांचे भाग ठरले आहेत. प्रभागाची रचना बदलल्यास, आरक्षण पडल्यास पर्याय म्हणून जवळच्या काही भागांतही काम केले आहे. आता जागा वाटप अंतिम टप्प्यात असताना त्या साऱ्यांचा विचार पक्षांकडून केला जात आहे.
सध्या महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गटातील इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून काही जागांचा आग्रह होत आहे. त्यामुळे ताकदीच्या इच्छुकांना मुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Kolhapur Election : जागा कमी, इच्छुक जास्त; आघाडी-युतीच्या गणितात अनेकांचा ‘दे धक्का’ प्लॅन बी तयारमुलाखती दिलेल्या इच्छुकांची कोणती तयारी आहे, याची सर्व्हेतून तपासणीही केली आहे. जिथे इच्छुक कमी वाटतो, तिथे पर्याय म्हणून समोरच्या पक्षातील इच्छुकाला जागा देऊन तडजोड करण्यात येत आहे.
ताकदीचा उमेदवार असेल; पण त्या पक्षाला ती जागा मिळणार नसल्यास त्याला आपल्या पक्षातून उमेदवारी देण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. या पद्धतीने काही ठिकाणांचे उमेदवार बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे.
काही प्रभागांत युतीतील पक्षांत चांगले उमेदवार आहेत; पण जागेच्या मर्यादेमुळे ठरविलेल्या जागेवर उभे राहता येत नाही. त्यावेळी महिला, ओबीसी आरक्षणातून लढण्याचा पर्याय दिला जात आहे. आघाडीतही काही जागांबाबत त्या पद्धतीने काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट विचार करत आहेत.
काही जागांवर अनेकांनी हक्क सांगितला आहे. त्याबाबत कुणाला जागा सोडायची, हा प्रश्न महायुतीत आहे. एकाला दिल्यास त्यातून नाराजी ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन पक्षांव्यतिरिक्त वेगळ्याच पक्षाला द्यायचे, असे नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. त्यातून राज्यातील सत्तेसोबत असलेल्या जनसुराज्य शक्ती, ताराराणी आघाडी, असे पर्याय समोर येऊ शकतात.
या प्रक्रियेमुळे इच्छुकाला वेळ देत निर्णय घेण्यास सांगितले जात आहे. त्यातून संपूर्ण जागा वाटपाचे घोडे अडले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबर आहे. छाननीपर्यंत म्हणजे ३१ पर्यंत पक्षांचे ए, बी फॉर्म दिले जाऊ शकतात. वादाच्या जागांसाठी तोडगा?