पुणे : प्रवासी संख्येत पुणे विमानतळ देशातील आठव्या स्थानी आले आहे. नोव्हेंबरमध्ये पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांची संख्या ही ९ लाख ५८ हजार ६०२ इतकी झाली.
तर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी असे मिळून ९ लाख ८९ हजार २३५ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. देशातील १० विमानतळांच्या क्रमवारीत पुणे विमानतळाने आठव्या स्थानी झेप घेतली आहे.
पुणे विमानतळाहून प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. नोव्हेंबर २५ मध्ये या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी यांचा एकत्रित विचार केला तर प्रवाशांची संख्या १० लाखांच्या घरात पोचली आहे.
नोव्हेंबर २५ मध्ये देशातील टॉप १० विमानतळामध्ये प्रथम स्थानी दिल्ली विमानतळ आहे. तर मुंबई दुसऱ्या स्थानी आहे. दिल्ली विमानतळावरून सुमारे ५४ लाख तर मुंबई विमानतळावरून सुमारे ३५ लाख प्रवाशांनी प्रवास केला. ही संख्या देशांतर्गत प्रवाशांची आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्येचा विचार केला तर ती संख्या आणखी जास्त आहे. सर्वात कमी प्रवाशांची वाहतूक गोवा (दाबोलीम) विमानतळावरून झाली आहे.
Pune Airport : पुणे विमानतळावरील ‘प्रवास’ आता सुसह्य; प्रवासी आनंदले; गोंगाट अन् गर्दीही नाही महिन्यात ३१ हजार आंतरराष्ट्रीय प्रवासीपुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय सेवेला मर्यादा आहेत. तरी देखील अवघ्या महिन्यात ३०,६६३ प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. पुणे विमानतळावरून अबुधाबी, दुबई व बँकॉक या तीन आंतरराष्ट्रीय ठिकाणी सेवा सुरू आहे. पुणे विमानतळाचे प्रश्न सुटल्यास या संख्येत मोठी वाढ होईल.