धक्कादायक घटना! 'बेकायदेशीररीत्या गर्भपात केल्याने महिलेचा मृत्यू'; लग्न झाल्यानंतर माहेरीच थांबली अन् काय घडलं?
esakal December 26, 2025 08:45 AM

बार्शी शहर : श्रीपत पिंपरी (ता. बार्शी) येथील महिलेची सोनोग्राफी करून त्यानंतर तिचा बेकायदेशीररीत्या गर्भपात केल्याने मृत्यू झाला. या घटनेत महिलेचा नाहक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत बार्शी तालुका पोलिसात एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा झाला आहे.

Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?

तालुका पोलिस ठाण्यातील हवालदार अभिजित घाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीपत पिंपरी (ता. बार्शी) येथे (ता. १४) रोजी वृषाली वैभव मोरे (वय २८, रा. बोरगाव (काळे) ता. जि. लातूर, सध्या रा. श्रीपत पिंपरी, ता. बार्शी) ही विवाहिता डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये अवस्थेत सकाळी ११.३० वाजता दाखल झाली. याबाबतची नोंद पोलिस ठाण्यास प्राप्त झाल्यामुळे त्याचा तपास करून तो अहवाल तहसीलदार आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना पाठवला आहे.

पोलिसांच्या गोपनीय अहवालानुसार सदर महिलेचा मृत्यू हा बेकायदा गर्भपात झाल्यामुळे झाला आहे, या अनुषंगाने तपास केला त्यानुसार येथील मुलीचे वडील काकासाहेब नरसिंह पाटील यांनी सांगितले की, त्यांची मुलगी वृषाली हिचा बोरगाव काळे ( जि. लातूर) येथील वैभव बाळासाहेब मोरे यांच्याशी २०२३ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर तिला एक मुलगी झाली त्यानंतर ती पुन्हा गरोदर राहिली. घरातील नातेवाइकांचे लग्न असल्याने वृषाली ही माहेरी आली होती.

नातेवाइकाचे लग्न झाल्यानंतर ती माहेरीच थांबली होती, त्यावेळी तिने सोनोग्राफी तपासणी करायची आहे, अशी म्हणाली होती. आई-वडिलांनी याला विरोध केला आणि रागावले होते. परंतु, ६ डिसेंबर रोजी वृषालीसह देवदर्शनाकरता सर्वजण पंढरपूरला गेले. त्यावेळी वृषाली मैत्रिणीकडे जाते म्हणून दुसरीकडे गेली. तेथे तिने विकास पवारला सर्वजण श्रीपतपिंपरी येथे गावी परत आली. ११ डिसेंबर रोजी वृषाली हिच्या भाऊ ओंकार यास दुपारी पावणेचार वाजता वृषाली हिने भाऊ ओंकार यास फोनवरून माझ्या मैत्रिणीला फोनवरून २५ हजार रुपये पाठव असे सांगितले.

त्यामुळे भावाने संबंधित नंबरवर २५ हजार रुपये पाठविले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता शेतातून सगळेच घरी आल्यावर तिला कसलातरी त्रास होत असल्याचे जाणवले. त्यावेळी तिने पंढरपूर येथील विकास यांच्याकडे सोनोग्राफी केली. त्यांनी मुलगी असल्याचे सांगितले. त्यामुळे ११ डिसेंबर रोजी ते येथे येऊन त्यांच्यासोबतच्या महिलेने गोळ्या देऊन त्यांनीच माझा गर्भपात केला आहे. त्याचेच पैसे मी ओंकार यास फोन पे वरून पाठविले, असे वृषालीने आई वडिलांना सांगितले.

आनंदाची बातमी! 'पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास लवकरच १६० किमी वेगाने'; प्रवाशाच्या वेळेची हाेणार बचत..

परंतु, १४ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास वृषाली ही घरात चक्कर येऊन पडल्याने गावातील डॉ. गरदडे यांना घरी बोलावून बघण्यास सांगितले. तेव्हा डॉ. गरदडे यांनी रुग्णाची परिस्थितीत गंभीर आहे. तत्काळ बार्शीकडे घेऊन जा असे सांगितले. त्यानंतर मुलगी वृषाली हीस जगदाळे हॉस्पिटल येथे दाखल केले. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी मुलगी वृषाली मोरे मृत झाल्याचे घोषित केले. अधिक तपास पोलिस उपअधीक्षक अशोक सायकर करत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.