म्हणून वंदनाने भाजप नेत्याच्या हत्येचा रचला होता प्लान… अखेर पोलिसांनी सत्य शोधून काढलंच
Tv9 Marathi December 26, 2025 08:45 AM

भाजप नेत्याची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे… रात्री झोपेत असताना भाजप नेत्यावर गोळीबार करण्यात आला. सहारनपूर जिल्ह्यातील नाकुर भागातील तिडोली गावात 7-8 नोव्हेंबरच्या रात्री भाजप नेते धरम सिंह कोरी यांची त्यांच्या घरात झोपलेल्या असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलीसांनी गावातील साबिर आणि वंदना नावाच्या एक महिलेला अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे… हत्येचं मुख्य कारण शत्रुत्व आणि सूड हे होतं… कारण वंदनाच्या गैरवर्तन आणि वेश्याव्यवसायाच्या तक्रारींनंतर, धरम सिंग यांनी तिला माहेरी पाठवलं होतं आणि तिला गावात येण्यास बंदी घातली होती. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी वंदाना आणि प्रियकर साबिर यांनी फटाक्यांच्या आवाजात भाजप नेत्याची हत्या केली आहे.

पोलीस अधीक्षक सागर जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती धरम सिंग कोरी यांच्या ओळखीने वंदना हिचं लग्न गावातील एका व्यक्तीसोबत झालं. लग्नाच्या काही दिवसांनंतर गावकऱ्यांनी धरम सिंग यांच्याकडे तक्रार केली की, वंदना हिचं वर्तन योग्य नाही ती आणि वेश्याव्यवसायात गुंतलेली आहे.

एवढंच नाही तर, वंदना आणि गावातील व्यक्ती साबिर यांचं प्रेमसंबंध होते.. वंदनाने साबीर आणि त्याच्या एका साथीदारासह तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ही हत्या केली. 6 नोव्हेंबरच्या रात्री गावात लग्ने सुरू होती आणि मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात होते. आरोपींनी सुरु असलेल्या आवाजाचा फायदा उचलला आणि मध्यरात्री भाजप नेते धरम सिंह यांची हत्या केली.

आरोपींनी गोळीबारकेला आणि फटाकांच्या आवाजामुळे भाजप नेत्याला गोळी लगाली असं कळलं नाही… या घटनेनंतर, अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि तीन पथके तैनात करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गावातील संशयितांची चौकशी केली. चौकशी दरम्यान, पोलिसांना वंदना हिच्यावर संशय आला. जी घटनेनंतर पुन्हा गावात रहायला गेली होती.

पोलिसांनी साबीर आणि वंदना यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडून हत्येत वापरलेले 315 बोअरचे पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.