बांग्लादेशात सध्या मोठ्या प्रमाणात भारत विरोध सुरु आहे. हिंदुंवर हल्ले होत आहेत. बांग्लादेशात भारत विरोधी वक्तव्य सुरु आहेत. पण त्याचवेळी हे सुद्धा सत्य आहे की, बांग्लादेशच्या विजेची डोर भारताच्या हातात आहे. बांग्लादेश मोठ्या ऊर्जा संकटाच्या तोंडावर उभा आहे. कूटनितीक संबंध अजून बिघडले, याचा परिणाम व्यापावर झाला तर शेजारी देशाचा एका मोठा भाग अंधारात बुडून जाईल. परिस्थिती अशी आहे की, तिथल्या वीज पुरवठ्यासाठी भारत फक्त एक शेजारी नाही, तर लाइफलाइन बनलाय.
वीजेसाठी त्यांचं भारतावरील अवलंबित्व किती मोठ्या प्रमाणात वाढलय हे बांग्लादेश सरकारचे आकडे सांगून जातात. मागच्यावर्षीच्या तुलनेत भारताकडून वीजेची आयात 70 टक्क्याने वाढली आहे. बांग्लादेशात एकूण वापरल्या जाणाऱ्या वीजेमध्ये भारताचा हिस्सा 17 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. काही काळापूर्वी हाच आकडा 9.5 टक्के होता. म्हणजे बांग्लादेशमध्ये प्रज्वलित होणाऱ्या 100 ब्लबपैकी 17 बल्ब भारतातून पाठवण्यात आलेले आहेत. सध्याच्या क्रॉस-बॉर्डर करारानुसार,बांग्लादेश भारताकडून सरासरी 2200 ते 2300 मेगावॅट वीज दरदिवशी विकत घेत आहे.
भारतातून बांग्लादेशला किती मेगावॅट वीज पुरवठा होतो?
या संपूर्ण सप्लाय चेनमध्ये सर्वात मोठं नाव गौतम अदानीची कंपनी ‘अदानी पावर’च आहे. भारतातून बांग्लादेशला पुरवठा होणाऱ्या वीजेपैकी सर्वात मोठा हिस्सा जवळपास 1,496 मेगावॅट वीज एकट्या अदानी पावरच्या झारखंड स्थित गोड्डा प्लांटमधून सप्लाय होते. बांग्लादेशच्या एकूण गरजेपैकी हा एक मोठा हिस्सा आहे. त्याशिवाय एनटीपीसी (NTPC) आणि पीटीसी इंडिया (PTC India) सारख्या सरकारी आणि खासगी कंपन्या सुद्धा पुरवठ्यासाठी मदत करतात. अदानी पावरचा हिस्सा यामध्ये सर्वात महत्वाचा आहे. तांत्रिक किंवा राजकीय कारणांमुळे ही स्पालय चेन बाधित झाली, तर बांग्लादेशच ग्रिड संतुलन बिघडणं निश्चित आहे.
वीजेचा मास्टर स्वीच सध्या भारताच्या हातातच
एकवेळ अशी होती जेव्हा बांग्लादेश वीजेचा दोन-तृतीयांश भाग घरगुती नॅचरल गॅसपासून बनवायचा. पण आता तिथल्या तेल विहिरींमध्ये तांत्रिक अडचणी आणि लो-प्रेशरची समस्या कॉमन झाली आहे. गॅसच्या कमतरतेमुळे त्यांचे अनेक प्लांट पूर्ण क्षमतेने चालत नाहीत हे बांग्लादेश पावर डेवलपमेंट बोर्डाचे अधिकारी सुद्धा मान्य करतात. दुसरीकडे मेंटेनेंसमुळे कोळसा आधारित वीज उत्पादन 30 टक्क्याने घटून 26 टक्क्यावर आलं आहे. एलएनजीची आयात वाढूनही वीज उत्पादनात घसरण झाली आहे. त्यामुळेच बांग्लादेश भारताकडून मिळणाऱ्या वीजेवर अवलंबून आहे. ऊर्जा एक्सपर्टनुसार निकट भविष्यात बांग्लादेशसाठी स्वबळावर ही ऊर्जा कमतरता भरुन काढणं कठीण आहे. वीजेचा मास्टर स्वीच सध्या भारताच्या हातातच राहीलं.