मूळ नावापेक्षा आजकाल तो ‘दबंग स्टार’, ‘भाईजान’ अशाच नावाने ओळखला जातो. सगळ्या फिल्म इंडस्ट्रीचा भाई असलेला सलमान खान (Salman Khan) चक्क 60 वर्षांचा होतोय. यावर त्याच्या चाहत्यांचा तरी विश्वास बसेल का ? अजूननही तोच ऑरा, तोच स्वॅग घेऊन हिंडणाऱ्या सलमानचे तकोट्यावधी चाहते, उद्या त्याच्या वाढदिवसासाठी, त्याच्यापेक्षा जरा जास्तच उत्सुक असतील हे नक्की ! 27 डिसेंबरला सलमान खान 60 वा वाढदिवस साजरा करणार असून नेहमीप्रमाणे त्य़ाला शुभेच्छा देण्यासाठी वांद्रे येथील समुद्रकिनाऱ्याजवळच्या त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांचा मोठ्ठा समुद्र उधाणलेला असेल हे निश्चित.
सर्वांचा लाडका दबंग स्टार, भाईजान त्याचा वाढदिवस कुठे, कधी, कसा साजरा करणार हे जाणून घेण्याचीही चाहत्यांना उत्सुक असते. त्यातच हा त्याचा 60 वा वाढदिवस म्हणजे नक्कीच काही खास असणार. सलमान त्याचा हा स्पेशल बर्थडे कसा साजरा करणार, काय आहे त्याचा प्लान ?
60 व्या बर्थडेचं सेलिब्रेशन
यावर्षी सलमानच्या वाढदिवसाला काही खास नाही. नेहमीप्रमाणे, सलमान खानचा वाढदिवस त्याच जुन्या पद्धतीने साजरा होईल : ते म्हणजे एक प्रायव्हेट पार्टी एक खाजगी पार्टी. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान पुन्हा एकदा त्याच्या पनवेल फार्महाऊसवर कुटुंब आणि मित्रांसह एक छोटासं गेट-टुगेदर आयोजित करेल.
दरवर्षीप्रमाणे सलमान खान पनवेलमधील त्याच्या फार्महाऊसवर एक प्रायव्हेट बॅश ठेवणार आहे. त्या पार्टीत कुटुंबियांशिवाय काही जवळचे मित्र असतीलच, तसेच सलमानने आत्तापर्यंत ज्यांच्यासोबत काम केलं आहे ते सगळे दिग्दर्शक, त्यांनाही पार्टीसाठी निमंत्रण देण्यात येईल. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाहुण्यांची यादी थोडी छोटीशीच आहे, इंडस्ट्रीतल्या सगळ्यांना बोलावूमृन मोठा मेळावा नव्हे तर जुनी प्रोफेशनल आणि पर्सनल नाती, यावर फोकस केला जाईल.
तसेच सलमानसाठी एक स्पेशल ट्रिब्यूटही आयोजित करण्यात आला आहे. सलमानने ज्यांच्यासोबत काम केलं, त्या सर्व दिग्दर्शकांचे मेसेज असलेला एक स्पेशल व्हिडीओ तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये त्याचा फिल्मी प्रवास आणि त्याच्यासोबत काम केलेल्या लोकांनी सांगितलेला अनुभव यांचाही समावेश असेल.
पापाराझींसोबत कापणार केक
कोट्यवधी चाहते सलमान खानवर प्रेम करतात. एवढा मोठा स्टार असूनही त्याचे पाय आजही जमीनीवर आहेत. सलमान त्याचा वाढदिवस नेहमीच त्याच्या फार्महाऊसवर सेलिब्रेट करतो. पार्टी सुरू होण्यापूर्वी तो पापाराझींसोबत, फोटोग्राफर्ससोबत केकही कापतो. यावेळीही त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन असंच काहीस होणार आहे. सलमान खानला पाहत मोठे झालेल्या चाहत्यांसाठी हा क्षण खास आहे. सलमान खानने हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टारडम आणि बॉक्स ऑफिसची नवी व्याख्या तयार केली आहे.
सलमानच्या कामाबाबत बोलायचं झालं तर सध्या तो ‘द बॅटल ऑफ गालवान’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा टीझर सलमानच्या वाढदिवशीच, उद्या प्रदर्शित होणार आहे. “द बॅटल ऑफ गलवान” मध्ये सलमान एका गंभीर भूमिकेत दिसणार आहे. त्याने चित्रपटासाठी त्याच्या लूकमध्येही खूप मेहनत घेतली आहे. सलमानच्या वाढदिवशी त्याच्या चित्रपटाचा टीझर रिलीज होणे हे चाहत्यांसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नाही. सर्वजण त्याच्या वाढदिवाची उत्सुकतेने वाट पहात आहेत.