Vastu Shastra : हे पक्षी घराजवळ दिसणं म्हणजेच आनंदवार्ता, लवकरच तुमची भरभराट होणार
admin December 27, 2025 05:24 AM
[ad_1]

वास्तुशास्त्र हे नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन तत्त्वावर काम करते, वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा त्याचा परिणाम हा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत असतो, आणि जर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर घराला आर्थिक स्थैर्य लाभते, घरात नेहमी सुख समाधान आणि आनंदाचं वातावरण राहतं. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, जसे की असे काही झाडं आहेत, ते जर तुमच्या घरात असतील तर त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, तसंच वास्तुशास्त्रामध्ये असे काही पक्षी देखील सांगितले आहेत, हे पक्षी तुमच्या घरात आले किंवा घराच्या आसपास दिसले तर त्याचा अर्थ तुम्हाला लवकरच काही तरी चांगली बातमी मिळणार आहे, असा होतो, अशा काही पक्ष्यांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

पोपट – वस्तुशास्त्र आणि शकुनशास्त्रानुसार पोपटाला कुबेराचं प्रतिक मानलं जातं, जेव्हा पोपट तुमच्या घरात येतात किंवा तुम्हाला दिसतात, तेव्हा ते फार चांगले संकेत असतात असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. जर तुमच्या घरात पोपट आले तर लवकरच तुमची आर्थिक प्रगती होणार आहे, तुमचं कर्ज फिटणार आहे, तुमची भरभराट होणार आहेत, याचे ते संकेत असतात, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

कावळा – कावळा घरात येणं किंवा घराजवळ दिसणं हे देखील वास्तुशास्त्रात अतिशय शुभ मानलं गेलं आहे, याचा अर्थ लवकरच तुमच्या घरात पाहुण्याचं आगमन होणार आहे, असा होतो.

घुबड – घुबडाला माता लक्ष्मीचं वाहन मानलं जातं. त्यामुळे घराजवळ घुबड दिसणं हे अतिशय शुभ मानलं जातं. यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, लक्ष्मी मातेच्या कृपेनं घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात. पैशांची कमी राहत नाही असं वास्तुशास्त्र सांगतं.

कोंबडा – कोंबड्याला देखील शुभ मानलं गेलं आहे, जर तुमच्या घरात किंवा घराच्या परिसरात कोंबडा दिसला तर त्याचा अर्थ लवकरच तुमची तुमच्या एखाद्या जुन्या मित्रासोबत भेट होणार आहे, तसेच त्याच्याकडून काही शुभ समाचार तुम्हाला मिळू शकतो असा होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 


[ad_2]
Source link
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.