Aamir Khan-Kiran Rao : आमिर खानच्या दुसऱ्या बायकोवर झाली शस्त्रक्रिया, फोटो शेअर करत सांगितलं नेमकं काय झालं?
Saam TV December 29, 2025 07:45 PM

आमिर खानची दुसरी बायको रुग्णालयात दाखल होती.

किरण रावची एक शस्त्रक्रिया करण्यात आली

किरण रावने सोशल मीडियावर पोस्ट करून हेल्थ अपडेट दिले आहेत.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत असतो. आता आमिर खानची दुसरी बायको किरण रावला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. किरण राववर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. किरण रावची अपेंडिक्स सर्जरी करण्यात आली आहे. किरण रावने हॉस्पिटलमधून तिचे हेल्थ अपडेट्स दिले आहेत. तिने यासंबंधित सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

किरण रावने तीन फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत तिने तिच्या हॉस्पिटल रूममधून बाहेरचा निसर्ग दाखवला आहे. पहिल्या फोटोत सेल्फी पोस्ट केली आहे. दुसऱ्या फोटोत तिच्या हातातला हॉस्पिटलबँड दिसत आहे. ज्यावर किरण आमिर राव खान असे लिहिले आहे. तिसऱ्या फोटोमध्ये किरण राव हेल्दी खाताना दिसत आहे. तिने या पोस्टला एक कॅप्शन देखील लिहिले आहे. कॅप्शमध्ये तिने हॉस्पिटलच्या स्टाफ आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

किरण रावला शस्त्रक्रियेनंतरडिस्चार्ज मिळाला आहे. ती घरी गेली आहे. तसेच ती नवीन वर्षाचे स्वागत करायला तयार असल्याचे किरण रावने सांगितले. किरण रावने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करून तिच्यासाठी काळजी व्यक्त करताना दिसत आहेत. 2024 मध्ये रिलीज झालेला किरण रावचा 'लापता लेडीज' चित्रपट खूप गाजला.

View this post on Instagram

A post shared by Kiran Rao (@raodyness)