प्रसिद्ध दिग्दर्शकाचा चित्रीकरणादरम्यान अपघात झाला आहे.
शनिवारी सेटवर दिग्दर्शकाचा पाय फ्रॅक्चर झाला.
तातडीने शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे.
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान याचा मोठा अपघात झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या एका प्रोजेक्टच्या शूटिंग दरम्यान साजिद खानचा अपघात झाला. ज्यामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर लगेचच त्याला वैद्यकीय मदत देण्यात आली आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. साजिदच्या अपघाताची माहिती मिळताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली.
साजिद खानची बहीण फराह खानने भावाचे हेल्थ अपडेट दिले आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, फराह खानने सांगितले की, "साजिदची शस्त्रक्रिया झाली आहे आणि तो लवकर बरा देखील होत आहे..." साजिद खान शूटिंग दरम्यान पडला, ज्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाले. सध्या त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. शनिवारी साजिद खानचा अपघात झाला आणि रविवारी त्याच्यावर शस्त्रक्रियाझाली.
वर्कफ्रंटसाजिद खानएका मोठ्या ब्रेकनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. 'हमशक्ल' (2014 ) हा त्याचा शेवटचा दिग्दर्शित चित्रपट होता. त्याने 'डरना जरूरी है' (2006) या भयपटाने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. 2007 मध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान यांच्या 'हे बेबी' या चित्रपटाने त्याला मोठे यश मिळाले. 2010 मध्ये साजिदने 'हाऊसफुल' फ्रँचायझी लाँच केली. जी खूप लोकप्रिय ठरली.
View this post on Instagram
अलिकडच्या काळात साजिद 'बिग बॉस'मध्ये दिसला. तो 'बिग बॉस 16' चा भाग होता. त्याचा गेम चाहत्यांना खूप आवडला. चाहते आता साजिद खानच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहे.
Marathi Actor : मराठमोळ्या अभिनेत्याला मातृशोक; कर्करोगाशी झुंज अपयशी, सुनेने शेअर केली भावुक पोस्ट