Marathi Actor : मराठमोळ्या अभिनेत्याला मातृशोक; कर्करोगाशी झुंज अपयशी, सुनेने शेअर केली भावुक पोस्ट
Saam TV December 29, 2025 07:45 PM

प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अभिनेत्याच्या आईचे कर्करोगामुळे निधन झाले आहे.

अभिनेत्याच्या बायकोने ही दुःखद बातमी सांगितली आहे.

मनोरंजन विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या आईचे निधन झाले आहे. मराठी मालिकांमधून घराघरात पोहचलेला अभिनेता प्रसाद जवादेच्या आईचे दुःखद निधन झाले. वयाच्या 65 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रसादची आई प्रज्ञा जवादे काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र काल (28 डिसेंबर 2025) ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

View this post on Instagram