एवढी गर्दी की, 'थलपती' विजय कोसळला, जीवघेण्या प्रसंगातून थोडक्यात बचावला, viral video
esakal December 30, 2025 06:45 AM

साऊथचा सुपरस्टार थलापती विजय सध्या चर्चेत आहे. त्याने एका कार्यक्रमात सिनेसृष्टीतून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्याच्या सिनेसृष्टी सोडण्याच्या निर्णयाने अनेकांनी नाराजी व्यक्त केलीय. त्याचा शेवटचा सिनेमा 'जन नायकन' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच दरम्यान विजयसोबत एक धक्कादायक घटना घडलीय. तो मलेशियाहून परत येत असताना त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी इतकी होती की, बॉडीगार्डला सुद्धा गर्दी आवरत नव्हती. त्याचवेळी विजयचा तोल गेला आणि तो खाली पडला.

निवृत्तीनंतर घोषणेनंतर त्याला भेटण्यासाठी चेन्नई विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. तो विमानतळाच्या बाहेर पडताच चाहत्यांच्या गर्दीनं त्याला घेरलं. तो आपल्या गाडीकडे जाताना त्याचा तोल गेला. आणि तो खाली पडला. सुदैवानं सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि गाडीत बसवलं.

मलेशियामध्ये झालेल्या जन नायकन सिनेमाच्या भव्य ऑडिओ लाँच कार्यक्रमात विजयनं निवृत्ती जाहीर केली होती. त्याच्या कार्यक्रमात जवळपास १ लाख उपस्थित होते. त्यावेळी बोलताना तो म्हणाला की, 'या क्षेत्रात आल्यानंतर मला वाटलं मी छोटा किल्ला बांधतोय. परंतु तुम्ही माझ्यासाठी भक्कम किल्ला उभारला. चाहत्यांनी माझ्यासाठी सगळं सोडलं. आता त्यांच्यासाठी मला उभारण्याची वेळ आलीय. त्यामुळे मी सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला.'

9 जानेवारीला विजयचा शेवटचा सिनेमा

विजयचा 'जन नायकन' हा सिनेमा ९ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या ऑडिओ ला्चची नोंद मलेशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्याने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

साऊथ सुपरस्टार थलपती विजयने केली निवृत्तीची घोषणा, 'जय नायकन' शेवटचा सिनेमा असणार, म्हणाला...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.