यवतमाळ : यवतमाळ पालिकेच्या सभागृहात गेल्या अनेक वर्षांपासून दोन गुरुजींचा ‘बुलंद’आवाज होता. गेल्यावेळी त्यात आणखी एकाची भर पडली. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूनी ‘क्लास’घेणारे गुरुजी होते. यंदा तीनही गुरुजींचा राजकीय ‘गेम’ झाला असून एका गुरुजींचे राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसीला मुदतवाढ, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाचवेळी खात्यात जमा होणार..सभागृहात सत्ताधारी भाजपकडून प्रा. डॉ. अमोल देशमुख, प्रा. प्रवीण प्रजापती अनेक वर्षांपासून खिंड लढवीत आहेत. शहराची हद्दवाढ झाल्यानंतर प्रा. अनिल उर्फ बबलू देशमुख या आणखी एका गुरुजींची भर पडली. यामुळे गेल्या पालिकेच्या सभागृहात बरेचदा या तीनही गुरुजींची जुगलबंदी होत होती. भाजपचे प्रा. देशमुख व प्रजापती या दोन गुरुजींनी तर नगराध्यक्षांच्या विरोधात आवाज बुलंद केला होता. सत्ताधार्यांवर काँग्रेसचे गुरुजी प्रा. बबलू देशमुख यांनीही सहकारी नगरसेकांसोबत अंकुश ठेवला होता.
मात्र, २०२५ च्या पालिका निवडणुकीत प्रा. अमोल देशमुख यांना उमेदवारीच मिळाली नाही. प्रा. प्रवीण प्रजापती तसेच प्रा. बबलू देशमुख यांना उमेदवारी मिळाली. मात्र, त्यांच्या पराभव झाला. या पराभवात ‘स्वकीयांचा’ हात तर नाही ना? अशी चर्चाही दबक्या आवाजात का होईना, सुरू आहे. यामुळे पालिका सभागृहात तीनही गुरुजींचा राजकीय ‘गेम’ करण्यात आल्याचे पदाधिकारी उघडपणे बोलू लागले आहेत.
Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं? पुनर्वसन अन् वेटिंगपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून गुरुजींना संधी मिळेल काय, अशी चर्चा सुरू असतानाच आता ‘त्या’ ठिकाणाहूनही दोन गुरुजींचा ‘गेम’ तर होणार नाही ना, अशी चर्चा आहे. प्रा. डॉ. अमोल देशमुख यांना उमेदवारीच मिळाली नसल्याने या एका गुरुजींचे पुनर्वसन होण्याची शक्यता आहे.