Nashik Assault Case Love Relationship : दोघांनी चॉपर व लाकडी दांडक्याने एका तरुणाची हत्या केल्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या पंचवटी भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओदेखील आता समोर आला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी संजय उशिले असं मृतकाचं नाव आहे. तसेच ओम गवळी आणि संतोष गवळी असं आरोपींचं नाव आहे. हे दोघेही काका पुतणे असल्याची माहिती आहे. शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नाशिकमधील पेठरोड परिसरातील अश्वमेधनगर येथे रवी मित्राशी बोलत असताना दोघांनी रवीवर हल्ला केला.
Nashik Farmers Protest : दिंडोरी-त्र्यंबकेश्वर बायपासला शेतकऱ्यांचा विरोध; भूसंपादनाशिवाय काम सुरू केल्याने संतापयावेळी आरोपीने चॉपरने आणि लाकडी दांडक्याने रवीवर वार केले. त्यात रवी गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णलायत दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा केला. यासंदरर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Nashik Cyber Fraud : नाशकात शेअर मार्केटच्या नावाखाली ७५ लाखांचा गंडा; संशयित दांपत्यासह तिघांवर गुन्हा दाखलदरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना काही तासांतच अटक केली आहे. दोघांना विल्होळी येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रवीचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून काका-पुतण्यांनी त्याची हत्या केल्याची माहिती आहे. याप्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.