हेमा मालिनी या चेन्नई आणि दिल्लीमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांना हिरवळ असलेल्या बंगल्यात रहायला आवडायचं. पण मुंबईत आल्यानंतर त्यांनी फ्लॅटमध्ये रहायची सवय लावून घेतली. एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथे यायला सांगितलं.
तिथे मी एक सी-फेसिंग अपार्टमेन्ट बघितलं. माझ्या वडिलांनी ते माझ्यासाठी विकत घेतलेलं. त्यांनी मला विचारलं की फ्लॅट आवडला का?. मी त्यांना सांगितलं की, मला दक्षिण मुंबईत रहायला आवडत नाही. मला चेन्नईसारखं अनेक झाडांमध्ये असलेलं घर हवं आहे. त्यावेळी त्यांनी जुहू मध्ये माझ्यासाठी बंगला शोधायला सुरुवात केली.
हेमा मालिनी यांनी त्यावेळची एक घटना सांगितली. राज कूपर सोबत त्या त्यांचा पहिला चित्रपट ‘सपनों का सौदागर’च शूट करत होत्या. त्यावेळी त्या वांद्रयात एका छोट्याशा अपार्टमेन्टमध्ये रहायच्या. त्याचा वापर कॉस्ट्यूम डिजाइनर भानु अथैया ड्रेस ट्रायलसाठी करायच्या. त्यानंतर त्या एका बंगल्या शिफ्ट झाल्या. तिथे त्यांना भुताटकीचे काही अनुभव आले.
दररोज रात्री मला वाटायचं की, कोणीतरी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करतोय. मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. मी माझ्या आई शेजारी झोपायचे. तिने पाहिलं की मी किती अस्वस्थ असते ते. हे एक-दोनवेळा झालं असतं तर मी दुर्लक्ष केलं असतं. पण हे प्रत्येक रात्री व्हायचं असं हेमा मालिनी यांनी त्या पुस्तकात लिहिलं आहे.