Ashes Test: पाचव्या कसोटी सामन्याचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, असं घडलं शेवटच्या दिवशी
GH News January 08, 2026 06:12 PM

एशेज कसोटी मालिका म्हंटलं तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेटचं द्वंद्व.. ही मालिका जिंकण्यासाठी खेळाडू जीवाचं रान करतात. ही मालिका ऑस्ट्रेलियात असल्याने कांगारूंचं पारडं जड होतं. पण इंग्लंड काही सहजासहजी मालिका सोडणार नाही असं वाटत होतं. पण पहिल्या तीन सामन्यातच या मालिकेचा फैसला झाला. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकले आणि मालिका खिशात घातली. पण इंग्लंडने चौथा कसोटी सामना जिंकला आणि प्राण अजून शिल्लक असल्याचं दाखवून दिलं. पाचव्या कसोटी सामन्याला तसा काही अर्थ नव्हता. पण इंग्लंड हा सामना जिंकून शेवट गोड करेल असा विश्वास क्रीडाप्रेमींना होता. तसं काही झालं नाही. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला.पण या सामन्याचा निकाल लागण्यासाठी पाचवा दिवस उजाडावा लागला हे विशेष.. नेमकं पाचव्या सामन्यात काय झालं ते जाणून घ्या.

नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने पहिल्या डावात 384 धावांची खेळी केली. त्यामुळे या सामन्यात इंग्लंड चमत्कार करणार असं वाटलं होतं. पण ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 567 धावा केल्या आणि 183 धावांची सरशी घेतली. त्यामुळे इंग्लंडचं गणित बिघडलं. पण इंग्लंडने जिद्द काही सोडली नाही. दुसऱ्या डावात ही आघाडी मोडताना 342 धावा केल्या. आघाडीच्या धावा वजा करून हाती 159 धावा पडल्या. तसेच विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 5 गडी गमवून पूर्ण केलं आणि मालिकेत 4-1 ने आघाडी घेतली. खरं तर आणखी 100 धावा यात असत्या तर कदाचित चित्र वेगळं असतं. कारण इंग्लंडने शेवटच्या दिवशी आघाडीचे पाच फलंदाज 120 धावांच्या आत तंबूत पाठवले होते. पण धावा कमी असल्याने तितका दबाव वाढवता आला नाही.

सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की, ‘पाचव्या दिवसापर्यंत चालणारे आणि शेवटी थोडे नाट्यमय खेळ असलेले कसोटी सामने नेहमीच भाग असणे हे एक उत्तम काम असते. मला वाटते की आपण आणखी 100 धावा करायला हव्या होत्या आणि आम्ही ऑस्ट्रेलियाला त्यांच्या पहिल्या डावात बॅटने 100 धावा जास्त करू दिल्या. जर तुम्ही पाचव्या दिवशी अशा प्रकारच्या विकेटवर 200 धावा पाहिल्या तर आम्ही बॉक्स सीटवर असतो. ऑस्ट्रेलिया एक अविश्वसनीय संघ आहे, त्यांनी काही अविश्वसनीय क्रिकेट खेळले. खेळाडू बॅटने उभे राहिले आणि अर्थातच चेंडूनेही काही उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांना खूप श्रेय द्यायला हवे. ‘

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.