Imaan Mazari : एका तरुणीमुळे पाकिस्तान रडकुंडीला, केली अशी मागणी की…असीम मुनीरचीही झोप उडाली!
GH News January 08, 2026 06:12 PM

Pakistan Imaan Mazari : पाकिस्तानात मानवी हक्कांसाठी लढा देणाऱ्या वकील आणि कार्यकर्त्या ईमान मजारी आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ईमान मजारी आणि त्यांचे पती हादी अली चट्ठा यांच्यावर पाकिस्तानचे लष्कर तसेच पाकिस्तानतील गाज्यसंस्थांबाबत अपमानापस्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे. ऑक्टोबर 2024 साली त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. नुकतेच त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईमान मजारी आणि त्यांचे पती हादी अली चट्ठा यांनी बुधवारी (7 जानेवारी) इस्लामाबादच्या न्यायालयात एक अर्ज दाळ करून लष्कराच्या मीडिया विंग इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या महासंचालकांना (DG ISPR) साक्षीदार म्हणून बोलावण्यात यावे, अशी मागणी केली आहे. आता ईमान माजरी आणि हाजी अली चट्ठा यांच्या या अर्जामुळे पाकिस्तानी लष्कराला थेट न्यायालयापुढे हजर राहावे लागू शकते.

नेमका आरोप काय आहे?

NCCIA ने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ईमान माजरी आणि हाजी अली चट्ठा यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या आरोपानुसार या पती-पत्नीने खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान येथे लोक गायब होण्याला सुरक्षा दलांना जबाबदार धरलं आहे. ईमान माजरी यांनी दहशतवादी संघटना आणि बंदी घातलेल्या काही संघटनांच्या विचारधारांशी मिळत्या-जुळत्या पोस्ट अपलोड केलेल्या आहेत. तसेच हाजी अली चट्ठा यांनी ईमान माजरी यांच्या याच पोस्ट रिशेअर केल्या आहेत, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानची सुरक्षा दले ही बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनांविरोधात लढण्यात असमर्थ असल्याचा दावा ईमान माजरी यांनी केलेला आहे, असाही आरोप त्यांच्यावर आहे. ईमान माजरी आणि हाजी अली चट्ठा यांनी हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत.

ईमान माजरी कोण आहेत?

ईमान माजरी या नेहमीच पाकिस्तानत चर्चेत असतात. बीबीसीच्या रिपोर्टनुसार ईमान माजरी या एका राजकारणात सक्रीय असलेल्या कुटुंबातून येतात. पाकिस्तानचे माजी मानवी हक्क विभागाचे मंत्री आणि इमरान खान यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या शिरीन मजारी यांची मुलगी आहे. ईमान यांनी युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण घेतलेले आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची बाजू त्यांनी लावून धरलेली आहे. दरम्यान, आता ईमान माजरी यांनी केलेल्या मागणीची न्यायालय काय दखल घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.