Harshwardhan Sapkal: आम्ही बडतर्फ केलं, भाजपनं पक्षात घेतलं! तुम्ही 'देवाभाऊ' नाही, 'घेवाभाऊ'; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
Sarkarnama January 10, 2026 06:45 AM

Harshwardhan Sapkal : राज्यातील फोडाफोडीचे राजकारण नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीनंतर महापालिकेतही सुरू आहे. काँग्रेस पक्षाने ज्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली, त्यांनाच भाजपने पक्षात प्रवेश दिल्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कमालीचे संतापले आहेत. जालन्यात त्यांनी भाजपवर राग व्यक्त करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 'तुम्ही देवाभाऊ नाही तर, घेवाभाऊ आहात' अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Harshvardhan Sapkal : फडणवीस डमरु वाजवणारे गारुडी, महाजन पिस्तुल्या ; कॉंग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवाभाऊ नसून घेवाभाऊ आहेत. ते दुसऱ्या पक्षातील नेते फोडतात, त्यांना भाजपमध्ये घेतात, अवैध व्यवसायातून, भूमाफियाकडून, शासकीय निधीतून गैरव्यवहार, भ्रष्टाचार करणारे आज सगळे लोक त्यांच्या पक्षात आहेत. पण ते गजनी असल्यामुळे त्यांना विसरण्याचा आजार झाला आहे, अशी टीकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधला.

Sunil Tatkare: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलिनिकरण होणार? सुनील तटकरेंनी दिले संकेत

भाजप आणि निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेला काळीमा फासत आहे. भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाने लोकशाहीला गुंडाळून ठेवले आहे. निवडणुकीत ऐनवेळी माघार घेणे किंवा बिनविरोध निवडणूक करणे हे लोकशाहीला मारक आहे. सत्ताधारी पक्षाकडून निवडणुकीत पैसा आणि गुंडागर्दीचा वापर वाढला. या बाबीला जनतेने गांभीर्याने घ्यावे, अन्यथा देशात अराजकता निर्माण होईल, असा इशारा सपकाळ यांनी यावेळी दिला.

दिल्ली मेट्रोच्या 75 लाख प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी मराठी माणसाच्या खांद्यावर!

श्रीलंका, बांगलादेशात जे झाले ते देशात होऊ नये म्हणून चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान भारत काँग्रेसमुक्त नव्हे तर भाजप काँग्रेसयुक्त झाले आहे. कारण अंबरनाथमधून आम्ही ज्यांना काँग्रेसमधून बडतर्फ केले, भाजपने त्यांनाच पक्षात घेतले आहे. भाजपला सर्वांचे विचार पुसून टाकायचे आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात सध्या नुरा कुस्ती सुरू आहे. अजित पवार यांनी आधी सत्तेतून बाहेर पडावे. मगच भाजपवर टीका करावी.

समृद्धी महामार्गात दोन हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सपकाळ यांनी यावेळी केला. या घोटाळ्यातूनच पन्नास खोके एकदम ओकेचा नारा आला आहे, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरही टीका केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.