ठाकरेंना मोठा धक्का, दगडू सकपाळांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश; बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, ला
Marathi January 11, 2026 03:25 PM

दगडू सपकाळ शिवसेना शिंदे ग्रुप मुंबईत सामील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सकपाळ (Dagdu Sapkal) यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मी छातीवर दगड ठेवून निर्णय घेतल्याचं दगडू सकपाळ म्हणाले. दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ या शिवडी विधानसभेतील प्रभाग क्र. 203 मधून इच्छुक होत्या. परंतु ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना तिकिट देण्यात आलं नाही. त्यामुळेच दगडू सकपाळ नाराज होते. त्यानंतर आज त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला. (Dagdu Sapkal Join Shivsena Shinde Group)

दगडू सकपाळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आजचा दिवस शिवसेनेसाठी आनंदाचा दिवस आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. दगडू सकपाळ हे बाळासाहेबांचे कट्टर आणि निष्टावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच कडवट कार्यकर्त्यांचा विचारही उबाठा गटात केला जात नाही, असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी केला. दगडू सकपाळ यांनी खऱ्या अर्थाने मुंबईच्या शिवसेनेचा पाया आहे. दगडू सकपाळ यांनी लालबागमध्ये शिवसेना वाढवली. आता लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाचा आर्शीवाद मिळाला, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. (Dagdu Sapkal Join Shivsena Shinde Group)

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात- (दगडू सपकाळ उद्धव ठाकरेंवर)

दगडू सकपाळ म्हणजे कणखर नेतृत्व असं म्हणत एकनाथ शिंदेंनी कौतुक केलं. तर गेला की तो कचरा अशा प्रकारचं बदनामी करून काही लोक मोकळे होतात, अशी टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केली. बाळासाहेब दगडूदादांना सवंगडी समजायचे, पण काही लोक आता घरंगडी समजायला लागले आहेत. घाटकोपरच्या सभेमध्ये दगडूदादांनी सांगितलं होतं, एकनाथ शिंदे एक दिवस नक्की मोठा होईल. मी शाखाप्रमुखपासून मुख्यमंत्री झालो, अशी आठवणही एकनाथ शिंदे म्हणाले.

कोण आहेत दगडू सकपाळ? (Who Is Dagdu Sapkal)

दगडू सकपाळ शिवसेनेचे माजी आमदार आहेत. दगडू सकपाळ हे शिवसेनेते अतिशय निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जात होते. लालबाग-परळ भागात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दगडू सकपाळ यांचे वजन होते. त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख जबाबदारी होती.

म्हातारं झाल्यामुळे पक्षाला आपली गरज संपली- दगडू सकपाळ (Dagdu Sapkal Join Shivsena Shinde Group)

मुलीला तिकीट दिलं नाही, पण पक्षाकडून साधी विचारपूसही करण्यात आली नाही. म्हातारं झाल्यामुळे पक्षाला आपली गरज संपली, अशा शब्दात दगडू सकपाळ यांनी नाजारी व्यक्त केली होती. दोन दिवसापूर्वी, मध्यरात्री दगडू सकपाळ यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळ येथील राहत्या घरी भेट घेतली होती. त्यानंतर दगडू सकपाळांनी शिंदे गटात जाण्याचे संकेत दिले होते. इतर कुणाला जर आपली गरज असेल तर आपण त्यावर विचार करू असं म्हणत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आज दगडू सकपाळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

संबंधित बातमी:

Dagdu Sakpal : शिवडीत ठाकरेंना धक्का! जुन्या शिलेदाराने साथ सोडली, माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.