शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील पहिला सामना हा बडोद्यातील कोटांबी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा या स्टेडियममधील पहिला सामना असणार आहे. या सामन्याच्या 1 दिवसआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी नेट्समध्ये जोरदार सराव केला. मात्र विराटने सराव सत्राबाबत मोठा निर्णय घेतला. विराट कायमच नेट्समध्ये जास्तीत जास्त सराव करत असतो. मात्र विराटने पहिल्या सामन्याच्या काही तासांआधी घेतलेल्या अशा निर्णयामुळे चाहत्यांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विराट या सराव सत्रात सहभागी झाला नाही. हे आपण जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरूद्धच्या सलामीच्या सामन्याआधी कर्णधार शुबमन गिल, रोहित शर्मा, केएल राहुल या अनुभवी खेळाडूंनी कसून सराव केला. ऋषभ पंत, उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज हे देखील सरावासाठी उपस्थित होते. हा सराव ऐच्छिक होता. त्यामुळे हा सराव सत्र बंधनकारक नव्हता. त्यामुळे विराटने सराव न करण्याचा निर्णय घेतला.