टीम इंडियाने 2026 वर्षातील पहिलाच टॉस जिंकला आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार शुबमन गिल याच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार शुबमनने बडोद्यातील कोटांबी स्टेडियममध्ये फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या सामन्यात टीम इंडिया तब्बल 6 गोलंदाजांसह खेळणार आहे. तसेच या सामन्यातून प्लेइंग ईलेव्हनमध्ये चौघांचं कमबॅक झालं आहे.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: डेव्हॉन कॉनव्हे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन आणि आदित्य अशोक.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.