वडापुरी, ता. १२ : संक्रातीसाठी लागणाऱ्या भाज्यांना इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आठवडे बाजारात मोठी मागणी वाढली असल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत.
आठवडे बाजारात भाज्यांची आवक कमी असल्याने दरात वाढ झाली असली तरी सणासाठी लागणाऱ्या वस्तू नागरिक खरेदी करत असताना दिसत आहेत.
यावर्षी इंदापूर तालुक्यात ज्वारीच्या पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत, तर ज्या ठिकाणी पेरणी झाल्या आहेत त्या ठिकाणी ज्वारीला कणसे सुद्धा आली नाहीत, त्यामुळे आठवडे बाजारात विक्रीसाठी आलेल्या ज्वारीच्या कणसाला चांगला भाव मिळाला. ज्वारीच्या कणसाला जोडी वीस ते तीस रुपये देवून खरेदी करावे लागले.
बुधवारी मकर संक्रांत असल्याने इंदापूर तालुक्यातील वडापुरी, काटी, शहाजीनगर बावडा, इंदापूर येथील आठवडे बाजारात सणाला लागणाऱ्या भाज्या खरेदी करताना नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.
भाज्यांचे भाव
वांगी ः ७० ते ८० रुपये किलो
गाजर ः ५० ते ६० रुपये किलो
ज्वारीची कणसे ः २० ते ३० रुपये जोडी.
वटाणा : ५० ते ६० रुपये किलो
घेवडा : ७० ते ८० रुपये किलो
भुईमूग शेंगा : १५० ते १६० रुपये किलो
साधी बोरे : वीस ते तीस रुपये वाटा