Maharashtra Live News Update : विमानतळावर गरबा खेळला, पण गणपतीत ढोल-लेझीम वाजले नाहीत- राज ठाकरे
Saam TV January 13, 2026 09:45 AM
विमानतळावर गरबा खेळला, पण गणपतीत ढोल-लेझीम वाजले नाहीत- राज ठाकरे

संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, लोक हिसकावून घेत होते. पण मुंबई महाराष्ट्राला मिळाली. प्रत्येक राज्याची स्वतःची संस्कृती असते, भाषा असते. नवरात्रीला गरबा खेळला जातो. मुंबईही होतो. आपले लोक गरबा खेळतात. चांगली गोष्ट आहे. वाईट काहीच नाही. आनंदाचा, सणाचा विषय आहे. पण मुंबईत महाराष्ट्र राज्याची राजधानी ....मुंबई विमानतळावर गौतम अदानीनं विमानतळ ताब्यात घेतलं तेव्हा तुम्हाला काय सांगायचं होतं त्यातून ही कृती केली तुम्ही....मुंबई विमानतळावर गरबा खेळला....तुमची ओळख पुसायची आहे...मुंबई तुमची नाही....गणपतीमध्ये ढोल लेझीम वाजवले का? वाजवायचे असतील मुंबई विमानतळावर तर ढोल लेझीम वाजवायचे...ही मुंबई मराठी माणसाची आहे. ठाणे हे मराठी माणसाचं आहे. तुम्ही आलात, भाषा वेगळी असली तरी...हे म्हणजे आमच्याकडे यायचं कपाट दुरुस्तीला आणि बायकोकडे नजर टाकायची ... हे चालणार नाही....

वी मुंबई विमानतळ सोडलं तर अदानीनं एकही विमानतळ बांधलं नाही- राज ठाकरे

तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो की नवी मुंबई विमानतळ सोडलं तर अदानीनं एकही विमानतळ बांधलं नाही. दुसऱ्यांनी बांधलेली विमानतळं गन पॉइंटवर घेतली. बंदरे....दुसऱ्यांनी बांधलेली गन पॉइंटवर घेतली. ही मला पाहिजेत म्हणून....विमानतळ, पोर्ट सोडून या माणसाचं काहीही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव आणि नरेंद्र मोदींचं नाव या एका गोष्टीवर हा माणूस अख्ख्या देशभर पसरत गेलाय.

ठाण्यावर संकट येईल तेव्हा मी दोस्ती बघणार नाही- राज ठाकरे

महाराष्ट्रावर संकट येईल, मुंबई, ठाण्यावर संकट येईल तेव्हा राज ठाकरे दोस्ती बघणार नाही.

अदानीशी दोस्ती करायला मी काय अडाणी नाही....काल दाखवलं त्याचं गांभीर्य बघा...

पाच कोटींची ऑफर नाकारणारे ...हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त- राज ठाकरे

सुशील आवटे यांना १ कोटी रुपयांची ऑफर झाली. पण त्यांनी ते नाकारले. अजून बरेच जण आहेत. कुठून येतो हा पैसा..काय चाललंय हे...किती पैसे वाटायचे..

एका घरात तीन लोकांना मिळून १५ कोटींची ऑफर- राज ठाकरे

सोलापूरला आमच्या विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून केला. फॉर्म मागे घेण्यासाठी...इथपर्यंत हे सरकार चाललंय. पोलीस हताश, कोर्टाकडे तर बघायला नको. हे कोणतं राज्य आहे. मला ती माणसं आणायची होती. प्रचारात गुंतलेत. इथे बोलावता आलं नाही. पाच पाच हजाराला मतं विकताहेत. दोन तीन माणसांची नावं घेतोय. बाकीचे येतीलच. शैलेश धात्रक. एका कुटुंबातील तिघे उभे आहेत. पूजा धात्रक, मनीषा धात्रक, किती पैशांची ऑफर झाली असेल. तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. या तीन लोकांना एका घरात मिळून १५ कोटींची ऑफर दिली गेली

नवी मुंबई मेट्रो मुंबईला जोडणार आहोत- मुख्यमंत्री
  • विरार अलिबाग कॉरिडोर म्यूल मोठा विकास होणार आहे

  • कळंबोली जंक्शन , कोस्टल रोड आणि नवीन मेट्रो ही तयार करतोय

  • नवी मुंबई मेट्रो मुंबईला जोडणार आहोत

  • रेल्वेच्या गाड्या सर्व डबे एसी करून बंद दरवाजे करणार आहोत महत्वाचं म्हणजे तिकीट दर वाढवणार नाही

  • एमएमआर रिजन मध्ये पाण्याच युद्ध सुरू आहे.. हा परिसर मुंबई पेक्षा मोठा होणार आहे.. पोशीर आणि शिलार धरणाला मंजुरी दिली

  • पुढील चार वर्षात नवी मुंबईची २०५० पर्यंतची तहान भागणार आहे

  • नवी मुंबईतील एसटीपी मधील १०० एमएलडी शिवरेजच पाणी एमआयडीसीला बंधनकारक करणार आहोत

मतदान जागृतीसाठी पीएमपीएमएल कडून अनोखे गीत
  • पक्ष,तिकीट वाटप,पक्ष बदल यावर या गाण्यातून केले भाष्य

  • ज्यांना कुठल्याही पक्षाकडून तिकीट मिळालं नाही, चिंता करू नका पीएमपीएल आहेच...

  • पीएमपीएल पक्षाचे तिकीट आता ऑनलाईनही उपलब्ध आहे..

  • रांगेत उभा राहायची गरज नाही

  • पीएमपीएलला प्राधान्य द्या

  • राजकीय तिकीट नाही पण बसच तिकीट पक्क.. त्यांना आम्ही थेट बसच तिकीट देतो

  • वेळेवर बसl,आरामदायक प्रवास आणि कमी ताण हे आमचं आश्वासन

  • पीएमपीएलने निवडा,मत नको,तिकीट पुरे..पक्ष बदल नाही फक्त थांबे बदल.. पीएमपीएल सोबत सुरक्षित प्रवास करा..

  • सुज्ञ मतदार नागरिकांना आपला योग्य उमेदवार निवडा १५ जानेवारीला तारखेला मतदानाचा हक्क बजावा ....

४ दिवसाचा नाही, पूर्ण वेळ नगरसेवक हवा, पुण्यातील तरुणाईची मागणी

सकाळ साम टिव्ही आणि यिन प्रस्तुत अपेक्षा तरुणाईच्या we are the voters या कार्यक्रमातून आज पुण्यातील ए आय एस एस एम एस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सध्याच्या rajkaranaababt स्पष्ट भूमिका मांडली. आम्हाला ४ दिवसाचा नाही पूर्ण वेळ नगरसेवक पाहिजे, तसंच पुण्यातील विविध विषयांवर आणि त्यांना येणाऱ्या समस्यांबाबत मतं व्यक्त केली.

कल्याण पूर्वेमध्ये संतापाचा उद्रेक, एअरहोस्टेस तरुणीच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यावर घेराव

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरात आज तीव्र तणावाची परिस्थिती निर्माण झाली. 21 वर्षीय एअर होस्टेस तरुणी हिने प्रेमसंबंधांतील छळ आणि फसवणुकीला कंटाळून 28 डिसेंबर रोजी आत्महत्या केल्याचा गुन्हा पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी कल्याण कोळसवाडी पोलिस ठाण्यात दाखल होता. मात्र गुन्हा दाखल होऊन पोलीस आरोपीला अटक करण्यात अपयशी ठरले. मात्र या दरम्यान या प्रकरणातील आरोपी कौशिक प्रकाश पावशे हा अपक्ष उमेदवार अनंता पावशे यांचा पुतण्या असून आरोपी त्याचा काका अनंता पावशे याचा प्रचार करण्यासाठी परिसरात फिरत असल्याचे तरुणीच्या घरच्यांना दिसून आला. नंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालत आरोपीला अटक करा ही मागणी करत तब्बल अर्धा तास घेरावा घालत गोंधळ घातला.

अदानींवर मोदींची कृपा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

राज ठाकरे यांनी अदानींच्या भरभराटीचा विषय मांडल्यावर आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. मोदींची आरती करून अदानी मोठे झाले. भाजपने अदानींना पाठीशी घातले आहे. मोदी म्हणजे अदानी, असे समीकरण असल्यानेच अदानींची ही भरभराट झाली, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.

कोल्हापुरात 2700 विद्यार्थ्यांनी साकारली मानवी रांगोळी

कोल्हापूर महानगर पालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शहरातील विविध शाळेतील 2700 विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळी साकारून मतदारांना आवाहन केलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने मतदारांना जागृत करण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुरात रोड शो

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागात रोड शो करीत प्रचारात रंग भरला. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळताना गेल्या पाच दिवसात अनेक प्रभागात जाहीर सभा घेतल्या. आज त्यांनी दाटीवाटीच्या बाबूपेठ भागात रोड शो केला. या रोड शो ला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. खासदार प्रतिभा धानोरकर आणि वडेट्टीवार यांनीच इथल्या प्रचाराचे नियोजन करीत पक्षाला स्पर्धेत आणले. या निवडणुकीत काँग्रेसला विजयापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील यांचं नाव देणार- मुख्यमंत्री
  • नवी मुंबई विमानतळास आपण दि बा पाटील यांचे नाव देणार आहोत.

  • विमानतळाच्या जवळ एज्युकेशन सिटी असेल. जिथे जगातील १२ युनिव्हर्सिटी येणार आहेत. मुलांना आता परदेशात जायची गरज नाही

  • इनोव्हेशन सिटी , स्पोर्ट्स सिटी , मेडिकल सिटी तयार करणार.

  • भारताचे ६५ डेटा सेंटर ताकद याच भागात . अर्थ व्यवस्थेला चालना देणारा हा भाग असेल.

  • दि बा पाटील यांच्या नावाचे राज्याने प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. लवकरच नाव देणार

निवडणूकीची तयारी पूर्ण- आयुक्त भुषण गगराणी

निवडणूकीची तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती मुंबईचे आयुक्त भुषण गगराणी यांनी दिलीये. ⁠१५ ला मतदान आणि १६ ला मतमोजणी तयारी झाली आहे, त्यामुळे सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावं, असं त्यांनी म्हटलंय.

Palghar: बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पालघरमध्ये शेतकऱ्यांनी रोखलं

पालघर -

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांशी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पालघरमध्ये शेतकऱ्यांनी रोखलं.

पालघरच्या शिगाव आणि हनुमान नगर येथील शेतकरी आक्रमक .

भूसंपादनाचा मोबदला न देताच काम सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप .

बुलेट ट्रेन प्रकल्पाचा काम सुरू असलेल्या ठिकाणी एकत्र येत शेतकऱ्यांनी काम रोखलं.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काही स्थानिक संघटनांचा देखील पाठिंबा.

मोबदला दिल्यानंतरच काम सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

बुरखा घालून येणार्या महिला मतदारांना ओळखण्यासाठी 'पडदानशिन' महिला कर्मचार्याची नियुक्ती होणार

राज्यात महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणुक विभागाकडून पडदा आणि बुरखा घालणार्या महिला मतदारांना ओळखण्यासाठी विशेष तरतुद. प्रत्येक मतदान केंद्रावर अशा महिलांची ओळख पटविण्यासाठी 'पडदानशिन' म्हणून महिलांची नियुक्ती. बोगस मतदान टाळण्यासाठी निवडणूक विभागाचा पुढाकार.

जळगावात शरद पवार गटाला धक्का! जिल्हाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

पाटील यांनी वैयक्तिक कारण पुढे करून पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला

त्यामागे नेमकी काय राजकीय पार्श्वभूमी आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

लातूरमध्ये भाजपा उमेदवाराच्या नातेवाईकडून पैसे वाटल्याचा प्रकार

लातूरच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये पैसे वाटपासाठी आलेल्या भाजपा उमेदवाराच्या नातेवाईकाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी पकडल्याचा प्रकार समोर आला आहे, यावेळी प्रभागात मोठ्या प्रमाणे काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले होते, दरम्यान पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत रोख रक्कम आणि यादी ताब्यात घेतली आहे.

Ambarnath: अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सदा मामा पाटील यांची निवड

अंबरनाथ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सदा मामा पाटील यांची निवड

अंबरनाथ विकास आघाडी 28 मते आणि अंबरनाथ शिवसेना महायुती विकास आघाडी ला 32 मते

सभागृहात चोर मामा गद्दार मामा काँग्रेस च्या घोषणा

Pune: पुण्यात मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी PMPML च्या १०५६ बसेस धावणार

पुणे -

पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी पीएमपीएम एलच्या १ हजार ५६ बसेस धावणार

आगामी मतदान प्रक्रियेसाठी पी एम पी एम एलच्या काही बसेस निवडणूक कामासाठी वापरात घेतल्या जाणार आहेत.

त्यामुळे १४ व १५ जानेवारी रोजी काही मार्गावरील बसेस कमी प्रमाणात उपलब्ध असू शकतात

त्यामुळे काही मार्गावर बस उशिरा येणे किंवा फेऱ्या कमी असणे शक्य आहे.

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये रेल्वेसाठी दोन तास रास्ता रोको

अहिल्यानगर -

रेल्वेसाठी दोन तास रास्ता रोको

नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर, अकोले मार्गेच न्यावी

या मागणीसाठी संगमनेर आणि अकोलेकर एकवटले

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोनवर मुख्यमंत्री भेटीचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे

18 किंवा 19 तारखेला रेल्वे संघर्ष समिती शिष्ठमंडळाशी चर्चेचे आश्वासन

पुणे - नाशिक महामार्गावर केला रास्ता रोको

आ.किरण लहामटे , किसान सभेचे डॉ.अजीत नवले , यांचेसह सर्व पक्षीय नेते आंदोलनात सहभागी

रास्ता रोको आंदोलनामुळे नाशिक - पुणे महामार्गावरील वाहतुक विस्कळीत

वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न

Pune: गुंड गजा मारणेला १५ आणि १६ तारखेला पुणे शहरात येण्यास परवानगी

पुणे -

गुंड गजा मारणेला १५ आणि १६ तारखेला पुणे शहरात येण्यास परवानगी

मुंबई उच्च न्यायालयाने दिली गजा मारणेला पुण्यात येण्याची परवानगी

१५ आणि १६ तारखेला गजा मारणेला दोन दिवस न्यायालयाची पुण्यात येण्याची परवानगी

गजा मारणे ची पत्नी जयश्री मारणे या राष्ट्रवादीकडून पुण्यात निवडणूक लढवत आहेत

पुण्यातील प्रभाग १० मधून जयश्री मारणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार

गजा मारणेला पुणे पोलिसांनी शहरात येण्यास घातली होती बंदी

पत्नी निवडणुकीला उभी असल्यामुळे तसेच त्याचे मतदान पुण्यात असल्यामुळे आता न्यायालयाने दिली परवानगी

अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाडा येथे घराला अचानक लागलेल्या आगीत मोठी दुर्घटना टळली असली तरी तीन आदिवासी कुटुंबांचे संसार अक्षरश राख झाले आहेत. समसा मोठ्या वसावे यांच्या घराला अचानक आग लागल्याने घर पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीने शेजारील आणखी दोन घरांना वेढा घातल्याने ती घरेही पूर्णत जळून खाक झाली आहेत.

नाशिक पुणे महामार्ग ठप्प! रेल्वेसाठी रास्ता रोको

नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर , अकोले मार्गेच न्यावी या मागणीसाठी संगमनेर आणि अकोलेकर एकवटले

पुणे - नाशिक महामार्गावर रास्ता रोको

आ.किरण लहामटे , किसान सभेचे डॉ.अजीत नवले यांच्यासह सर्व पक्षीय नेते आंदोलनात सहभागी

रास्ता रोको आंदोलनामुळे नाशिक - पुणे महामार्गावरील वाहतुक ठप्प

वाहनांच्या लांबच लांब रांगा

Nandurbar: नंदुरबारसह राज्यातील 21 जिल्ह्यांत सिकलसेल तपासणी मोहीम राबवणार

नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये सिकलसेल तपासणीची व्यापक मोहीम राबवली जाणार आहे. राज्यात सर्वाधिक सिकलसेल रुग्ण नंदुरबार जिल्ह्यात आढळून येत असल्याने येथे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. यासाठी सिकलसेल तपासणीचा पंधरवाडा राबवण्यात येणार असून, जिल्ह्यातील एकही नागरिक या मोहिमेपासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सखोल नियोजन करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेलचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून, त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचं चित्र आहे. विशेषतः प्रसूतीदरम्यान सिकलसेलग्रस्त महिलांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या संपूर्ण मोहिमेवर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचे विशेष लक्ष राहणार असून, नंदुरबार जिल्ह्यातून सिकलसेल हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

राष्ट्रवादीला सोबत घेऊन पश्चाताप झाला, भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर गोगावले यांची प्रतिक्रिया

अजित पवार यांना सोबत घेऊ नका असं सांगत असतानाही त्यांना सोबत घेतले आता त्याचा पश्चात्ताप होतोय असं भाजपचे पदाधिकारी म्हणू लागलेत. त्यावर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी सावध प्रतिक्रिया दिलीय. तो त्यांचा प्रश्न आहे आपण त्यावर फार काही भाष्य करू शकत नाही. पण उशिरा का होईना त्यांना कळलं आणि ते खरं बोलले असा टोलाही त्यांनी लगावला. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादी महायुती पासून दूर जाईल का या प्रश्नावर बोलताना त्यांचं काही माहिती नाही पण शिवसेना आणि भाजप युती कायम राहील , असं गोगावले यांनी ठामपणे सांगितलं.

Dhule: धुळ्यात नायलॉन मांजा चिमुकल्याच्या जीवावर बेतला

नायलॉन मांजा चिमुकल्याच्या जीवावर बेतला

मोटरसायकल स्वार चिमुकल्याचा मांजाने चिरला गळा

शिरपूर शहरातील करवंद रोड परिसरातील घटना

राज आनंदसिंग पिंपळे वय 7 असे जखमी मुलाचे नाव

राज पिंपळे हा आपल्या काका काकू च्या मोटरसायकलवर पुढे बसून जातांना घडली घटना

शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी गळ्यातून काढला मांजा

अंबरनाथ उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या सदाशिव पाटील यांचा अर्ज दाखल

शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सदामामांना उमेदवारी

32 जणांच्या गटनेतेपदी रवी करंजुले यांची निवड

आज दोन्ही गट आमने सामने येणार

कोणाचा होणार उपनगराध्यक्ष अंबरनाथ विकास आघाडीचा की शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडीचा?

थोड्याच वेळात अंबरनाथ विकास आघाडीचे प्रदीप पाटील हेही उमेदवारी अर्ज दाखल करणार

दुपारी एक वाजता या दोन्ही अर्जाची छाननी होणार

Parbhani: संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार यांची आत्महत्या

परभणीतील संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार यांनी केली आत्महत्या

४ दिवसांपूर्वीच झाली होती जमानत

त्यांच्या मिर्झापूर गावातील शेतात असलेल्या खोलीत घेतला गळफास

जवळपास १३ महिन्यानंतर दत्ता सोपान पवार यांची झाली होती जमानत

जमानती नंतर गावी मिर्झापूर येथे आले होते दत्त पवार

मनोज जरांगे पाटलांची छत्रपती संभाजीनगर शहरातून रॅली

मनोज जरांगे पाटील यांचे क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातून जरांगेची रॅली

क्रांती चौक ते केंब्रिज चौक पर्यंत जरांगे पाटील यांची अभिवादन रॅली

मनोज जरांगे पाटील यांनी क्रांती चौकात राजमाता जिजाऊ यांना केले अभिवादन

Kolhapur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिसळ कट्ट्यावर साधणार कोल्हापूरकरांशी संवाद

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या रणसंग्रमात उतरलेले आहेत. नेहमीप्रमाणे मोठी सभा अथवा रॅलीत सहभागी होण्याऐवजी यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरकरांशी थेट संवाद साधणार आहेत तेही मिसळ कट्ट्यावर. या कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली

Amravati: अमरावतीत भाजप ॲक्शन मोडवर, मतदानाच्या काही दिवस आधी 15 पदाधिकारी निलंबित

अखेर अमरावतीत भाजप ॲक्शन मोडवर आली असून अमरावती शहरातील भाजप पक्षातील 15 पदाधिकारी व सदस्य निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी ही कार्यवाही केली असून पक्षशिस्त भंग व पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. अधिकृत उमेदवारांविरोधात उघड बंडखोरीचा आरोप करत आणि पक्ष निर्णयांना विरोध व अपप्रचार केल्याचे निदर्शनास पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा निष्कर्ष काढन्यात आला असून संघटनात्मक शिस्त धोक्यात आल्याचे स्पष्ट सर्वांना प्राथमिक सदस्यत्व व पदांवरून तात्काळ निलंबन करण्यात आले.

अवकाशातून पडले दगडाचे तुकडे, भंडारा जिल्ह्यातील घटना

भंडारा तालुक्यातील परसोडी परिसरात आकाशातून दगडाचे दोन तुकडे पडल्याची घटना समोर आली. अचानक घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले. वैज्ञानिक कुतूहलही निर्माण झाले आहे. सायंकाळच्या सुमारास घडलेला हा प्रकार उल्का पडण्याचा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, हे दगड हलक्या वजनाचे असल्याने खगोलीय अभ्यासकांना याचा अभ्यास करावा लागणार आहे. दोन्ही दगड पोलिस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले.

Raj Thackeray: राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

मनसेच्या उमेदवारांसोबत साधणार संवाद

उमेदवारांच्या प्रचारफेरी दरम्यान उमेदवारांना भेट देणार

सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ४.४५ पर्यंत राज ठाकरे देणार उमेदवारांना भेटी

एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची एकत्र सभा

ठाकरे बंधूंची आज शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची एकत्र सभा... ठाण्यात सभेची जय्यत तयारी..

ठाण्यातील महत्त्वपूर्ण अशा राम गणेश गडकरी रंगायतन येथील चौकात असणार ठाकरे बंधूंची ही एकत्र सभा. होणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात ठाकरे बंधूंची ही सभा मुंबई नंतर लक्षवेधी ठरणार असून शिंदेच्या बालिकेल्ल्यात ठाकरे बंधू काय भाषणातून काय बोलतील या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंबरनाथमध्ये शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी

अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत साठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मिळून शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी हा गट स्थापन केला आहे. या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट चे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांना उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवारी देण्यात आली आहे . आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवकांनी कॉंग्रेस, भाजप यांना सोबत घेत अंबरनाथ विकास आघाडी हा गट स्थापन केला होता . मात्र अचानक या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी अंबरनाथ विकास आघाडीची साथ सोडत शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि त्यांच्यासोबत शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी हा गट रजिस्टर केला आहे . काँग्रेसचे 12 नगरसेवक काँग्रेसने सोबत गेल्याने काँग्रेस पक्षाने त्यांचं निलंबन केलं आहे त्यामुळे त्यांनी भाजपसोबत तयार केलेला अंबरनाथ विकास आघाडी हा गट अवैध ठरणार आहे .त्यामुळे त्यांनी दिलेला व्हीप राष्ट्रवादी काँग्रेसला लागू राहणार नसल्याचं बालाजी किणीकर यांनी सांगितलं

पुण्यातील एस आर ए वरून भाजपाने शिवसेनेमध्ये जुंपली

पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये एस आर ए वरून चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. कर्वेनगर आणि उत्तमनगर या पुनर्वसनाच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय 1978 पासून प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन महिन्यात प्रॉपर्टी कार्ड देण्याचं आश्वासन कर्वेनगर मध्ये प्रचारासाठी आलेले असताना दिल. तर त्यावर आता गुलाबराव पाटील यांनी सडेतोड उत्तर देत एवढे दिवस काय मुहूर्त काढत बसले होते का आणि हे प्रॉपर्टी कार्ड आम्हीच काढून देणार कारण नगर विकास खातं आमच्याकडे आहे.असं प्रत्युत्तर बावनकुळे यांना दिलेला आहे.

- भाजपकडून बंडखोर मुकेश शहाणेंवर कारवाई

मुकेश शहाणे यांची पक्षातून 6 वर्षांसाठी करण्यात आली हकालपट्टी

भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केली हकालपट्टी

दिपक सुधाकर बडगुजरांविरोधात प्रभाग 29 मध्ये मुकेश शहाणे लढवतायत अपक्ष निवडणूक

पक्ष शिस्त न पाळल्याचा ठेवण्यात आला ठपका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 21 मधील महिला उमेदवाराच्या घरावर अश्लील शिवीगाळ करून हल्ला

महापालिका निवडणुकीला अवघे तीन दिवस बाकी असताना पिंपरी चिंचवड शहरातील वातावरण अतिशय तणावपूर्ण होऊ लागला आहे. काल मध्यरात्री जवळपास एक वाजता दरम्यान प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवार प्रियंका सुनील कुदळे यांच्या घरावर काही अज्ञात युवकांनी शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरावर हल्ला केला असा आरोप कुदळे कुटुंबीयांनी करत पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.

परभणीच्या पाथरी तालुक्यातील गुंज शिवारातील 5 एकर ऊस जळून खाक , शेतकऱ्याचे मोठे नुकसान

परभणीच्या पाथरी तालुक्यातील गुंज शिवारातील 5 एकर तोंडणीला आलेला ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. शेतकरी आसाराम सोपान हारकळ याचा 5 एकर ऊस तोंडणीला आला होता मात्र मध्य रात्री अचानक आग लागली आणि पूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. या आगीत शेकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्या कडून केली जात आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार

पुण्यात आज ठिकठिकाणी विविध पक्षाच्या रॅली, पदयात्रा आणि कोपरा सभा

मतदारांवर छाप पडण्यासाठी सर्वच उमेदवारांकडून सर्वतोपरी प्रयत्न

सगळ्याच पक्षाचे विविध नेते यांच्या उपस्थितीत पार पडणार प्रचाराचे विविध कार्यक्रम

पुण्यात अजित पवारांचा रोड शो तर मुरलीधर मोहोळ यांच्या पदयात्रा, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होणार

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

मध्ये काही मोठी लोक येऊन शेर शायरी करून गेले आहेत...मला ही खुम खुमी आली आहे. हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता कई सपने घमंड और गलत दिशा में टूट जाते है। हुनर की बातें करने से कुछ नहीं होता। जमाना उसीको पहचानता है। जो मैदान में उतरकर साबित करें...

खोतकरांच्या लेकीसाठी दानवेंची लेक मैदानात,शिवसेना उमेदवारांसाठी आमदार संजना जाधव मैदानात......

जालना महानगर पालिकेचा प्रचार शिगेला पोहोचलाय. आमदार अर्जुन खोतकरांच्या लेकीसाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची लेक आमदार संजना जाधव मैदानात उतरल्या आहे. आमदार अर्जुन खोतकर यांची लेक दर्शना झोल खोतकर यांच्या प्रचारार्थ संजना जाधव यांची जाहीर सभा पार पडली.दरम्यान पक्षाने सांगितल्यास जालनाच काय भोकरदन ला जाऊन देखील प्रचार करेल अस आमदार संजना जाधव यांनी म्हटलंय.जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती मधील भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष स्वबळावर निवडणुका लढवत आहे.

यवतमाळातून ठाणे,विरार बंदोबस्तासाठी पोलीस रवाना

महानगरपालिकेतील निवडणुकीत 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.यासाठी ऐनवेळी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला असून यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील 450 पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना बंदोबस्ताला रवाना होण्याचा आदेश देण्यात आले आहे. त्यांना 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.