बळिराजा शेत, पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवा
esakal January 13, 2026 09:45 AM

बारामती, ता. ११ : ‘‘मुख्यमंत्री बळिराजा शेत, पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता ग्राम पातळीवर सभा घेऊन योजनेकरिता प्रोत्साहित करावे,’’ असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.
मुख्यमंत्री बळिराजा शेत/पाणंद रस्ते योजना बारामती व इंदापूर तालुक्यात राबविण्याच्या अनुषंगाने बारामती येथील कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे गुरुवारी (ता. ८) कार्यशाळेत नावडकर यांनी मार्गदर्शन केले. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग यांच्याकडील शासन निर्णय अन्वये ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडीमार्ग या रस्त्याचे सिमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याबाबत कार्यपद्धती व महसूल व वनविभाग यांच्याकडील शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री बळिराजा शेत/पाणंद रस्ते योजना सुरू करणे आणि ती राबविण्याकरिता सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत दिशानिर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांनी मिळून कार्यवाही करावी.’’
यावेळी तहसीलदार स्वप्नील रावडे, इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे, गट विकास अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक, नायब तहसीलदार, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.


14228

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.