rat12p26.jpg
17145
राजापूरः धोपेश्वर खंडेवाडी येथील ग्रामस्थांसमवेत शिवसेना युवा नेत्या अपूर्वा सामंत, प्रकाश कुवळेकर, योगेश नकाशे, उमेश शिवगण, सतीश खांबल, पुरूषोत्तम खांबल आदी.
-----------
शाश्वत विकासाचा संकल्प
अपूर्वा सामंत ः धोपेश्वर खंडेवाडीवासीयांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ : आमदार किरण सामंत यांना जनतेने दिलेल्या संधीच्या माध्यमातून राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघात शाश्वत विकास घडवण्याचा आमचा संकल्प आहे. या वाटचालीत आपणा सर्वांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून, आपण व्यक्त केलेला विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. यापुढेही जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी केले. त्यांनी धोपेश्वर खंडेवाडी येथील ग्रामस्थांशी विकासाबाबत संवाद साधला.
या वेळी शिवसेना जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, विभागप्रमुख जितेंद्र तुळसवडेकर, उपतालुकाप्रमुख राजन कुवळेकर, माजी विभागप्रमुख नरेश दुधवडकर, माजी उपसभापती उमेश पराडकर, योगेश नकाशे, प्रसन्न मालपेकर, धोपेश्वरचे सरपंच उमेश शिवगण, माजी सरपंच सतीश खांबल, पुरुषोत्तम खांबल, नेत्रा सोगम, प्रसाद गुरव, गावकार धनंजय खंडे, अध्यक्ष रवींद्र बांदिवडेकर आदी उपस्थित होते. धोपेश्वर खंडेवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.