महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून राज्यातील राजकीय पक्षांलाठी आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसह प्रमुख शहरांमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून सकाळी १० वाजेपासून निकालांचे कल समोर येण्यास सुरुवात होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक ठिकाणी अटीतटीची लढत असल्याने प्रत्येक फेरीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. निकालांचे थेट अपडेट्स, आघाडी-पिछाडी आणि सत्तासमीकरणांतील बदल क्षणोक्षणी या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत.