शिवसेनेतर्फे आज
मेढ्यात मुलाखती
केळघर, ता. १६ : जावळी तालुक्यातील शिवसेना पक्षाकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या उद्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. उमेदवारांनी आपला कार्य अहवाल घेऊन मुलाखतीसाठी दुपारी एक वाजता मेढा येथील शिवसेना कार्यालय शिवकृष्ण हाईट्स येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जावळी तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी ताकदीने सामोरे जाण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याची माहिती शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांनी दिली.
-----------------------