MLG26B03156
माळीनगर (ता. माळशिरस) : तांबवे येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. संजय सिद, डॉ. अमोल माने-शेंडगे, डॉ. अविनाश जाधव, केतन बोरावके व इतर.
तांबवेतील आरोग्य शिबिरात
४४२ जणांची मोफत तपासणी
माळीनगर, ता. १६ : तांबवे (गट नं. २) येथील शिबिरात ४४२ गरजू व्यक्तींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. अकलूज रोटरी क्लब आणि रुक्मिणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय सिद, डॉ. अविनाश जाधव, डॉ. निसर्ग जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी डॉ. अमोल माने-शेंडगे, डॉ.अभिजित राजेभोसले, माळीनगर कारखान्याचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रदीप जाधव, संचालक निळकंठ भोंगळे, सुनील बोरावके, केतन बोरावके आदी उपस्थित होते.
या शिबिरात २५२ लाभार्थ्यांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला. त्यापैकी ६५ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची तातडीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. तसेच १९० लाभार्थ्यांची मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली. एच. व्ही देसाई नेत्र रुग्णालय, महम्मदवाडी(पुणे) येथील डॉ. आशिष चौधरी, डॉ.सलीम तांबोळी, सागर कोळेकर, सुभाष सोरटे यांनी तपासणी केली.