येरवडा परिसरातील शहादल बाबा रोडवर रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने अनेक वाहने, रिक्षा, दुचाकी आणि फुटपाथवरील नागरिकांना धडक दिल्याने संपूर्ण परिसर हादरला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
टेम्पो वाहन पूर्णपणे नियंत्रणाबाहेरलक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या माहितीनुसार, टेम्पो (क्र. एमएच-१२-क्यूजी-४८९४) चालक आदम चॉद शेख (वय ६२) याने अपघातापूर्वी अमली पदार्थांचे सेवन केले होते. भरधाव वेगात वाहन चालवताना त्याचे टेम्पो वाहन पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेले. अचानक ते फुटपाथवर घुसले आणि तेथे उभी असलेली रिक्षा, दुचाकी तसेच फुटपाथवर बसलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली.
Pune Traffic: सोमवारी पुण्यातले महत्त्वाचे रस्ते बंद! शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; 'हे' मार्ग टाळा अन् पर्यायी मार्ग बघाया भीषण धडकेत फुटपाथवर बसलेले सुशील निवृत्ती मोहीते (वय ४०, रा. येरवडा) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात आणखी काही जण जखमी झाले असून त्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. टेम्पोच्या धडकेमुळे परिसरातील अनेक दुचाकी, चारचाकी वाहने तसेच रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलीस पथक घटनास्थळी दाखलघटनेची माहिती मिळताच लक्ष्मीनगर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ चालक आदम चाँद शेख याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध अपघात, अमली पदार्थांचे सेवन आणि जीवितहानीस कारणीभूत ठरण्याबाबत कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी अपघाताची संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, चालकाने अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवल्याने हा अपघात झाला. पुढील तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Pune Accident: बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; एकजण जखमी, वाघोली रस्त्यावरील घटना, कामासाठी निघाले अन् काळाने गाठले!