ओतूर केंद्रावर थंडीतही मोठा उत्साह
esakal January 19, 2026 12:45 PM

ओतूर, ता. १८ : ओतूर (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ केंद्रावर सकाळ चित्रकला स्पर्धेला थंडीतही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बालचित्रकारांनी व पालकांनी केंद्रावर गर्दी केली होती. लहान व मोठे सर्वच चित्रकार रंगरेषांच्या दुनियेत रंगून गेल्याचे चित्र दिसून येत होते.
या स्पर्धेत प्राथमिक शाळा ओतूर नं.१, ओतूर नं.२, प्राथमिक शाळा उदापूर, प्राथमिक शाळा रोहोकडी, चैतन्य विद्यालय ओतूर, सावित्रीबाई फुले विद्यालय ओतूर, गाडगे महाराज विद्यालय ओतूर येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्राथमिक शाळा नं.१चे मुख्याध्यापिका सीमा डुंबरे, सतीश नलावडे, रुपाली डुंबरे, प्रदिप सुर्यवंशी, संतोष सोनवणे, प्रदिप मिरगे, गणपत डोंगर, प्रभाकर दिघे, प्रतिभा शेटे, तारा पानसरे, तुषार पानसरे, वनिता जाधव, राहुल पिंगट यांनी नियोजन केले. यावेळी सचिन आंबडेकर, शांताराम गायकर, योगेश डुंबरे, शेखर डुंबरे, विजय डुंबरे उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.