Famous Director Passes Away : प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ब्रेन स्ट्रोकशी झुंज अपयशी, मनोरंजनविश्वावर शोककळा
Saam TV January 19, 2026 01:45 PM

मराठी मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन झाले आहे.

दिग्दर्शक खूप वेळापासून ब्रेन स्ट्रोक या आजाराशी झुंज देत होता.

मराठी मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन झाले आहे. ज्यामुळे मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. दिग्दर्शक नितीन बोरकर यांनी काल (18 जानेवारी 2026 ) ला अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांचे निधन झाले. नितीन बोरकर यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.

खूप वेळापासून नितीन बोरकर यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांच्यावर नेरूळ येथील DY पाटील हॉस्पिटलमध्येउपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 18 जानेवारी 2026ला रविवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नितीन बोरकर गेल्याकाही महिन्यांपासून ब्रेन स्ट्रोक या आजाराशी झुंज देत होते.

नितीन बोरकर यांचे मराठी चित्रपटसृष्टीतमोलाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. कलाकारांनी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मिडियाच्या माध्यमांतून शोक व्यक्त केला आहे.

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घराला पहिल्याच आठवड्यात कोण करणार टाटा,बाय-बाय? रितेश भाऊंनी दिला मोठा धक्का नितीन बोरकर यांचे काम

प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन बोरकर अनेक वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. त्यांचा साधा-भोळा स्वभावाने त्यांनी अनेक माणसे जोडली. त्यांनी अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात 'दगडाबाईची चाळ' आणि 'मी वसंतराव' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच 'बॉडीगार्ड', 'द माइटी हार्ट’, 'आणि काय हवं' यांसारख्या चित्रपटांसाठी देखील काम केले आहे. नितीन बोरकर यांनी मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीतही काम केले आहे.

Komal Kumbhar : अफेअर समजताच बाप संतापला; अभिनेत्रीला पाईपनं बेदम मारलं, आता प्रियकरासोबतच करतेय सुखानं संसार, वाचा किस्सा
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.