मोठी बातमी! मंत्री पंकजा मुंडे यांचा तो निर्णय आणि मोठ्या घडामोडी, परळीत..
Tv9 Marathi January 19, 2026 12:45 PM

संभाजी मुंडे, परळी : मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वीच भाष्य करत पंकजा मुंडे यांनी म्हटले होते की, मी परळी धनंजयला दिली आहे. मी आता माळाकोळी बघणार आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यावर कायमच माळाकोळीने प्रेम केले. पंकजा मुंडे यांनी यादरम्यान अत्यंत मोठे संकेत दिले. युती आणि धनंजय मुंडे यांच्यासोबत असलेली कुटूता संपल्यानंतर पंकजा मुंडे यांना मतदार संघच राहिला नसल्याचे स्पष्ट झाले. आता परळीचे निर्णय धनंजय घेईल मी माळाकोळीकडे बघेल असेल स्पष्ट शब्दात पंकजा मुंडे यांनी सांगितल्यानंतर पंकजा मुंडे यांनी मोठा निर्णय घेत परळी नगर परिषदेचे उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे सोपवले. पंकजा मुंडेंनी आपल्या विधानावर शिक्कामोर्तब केल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस परळी नगरपरिषदेत बरोबरीची निवडणूक लढले. भाजपाचा तब्बल नऊ नगरसेवकांचा गट असतानाही भाजपला उपनगराध्यक्ष पदासाठी डावलण्यात आले. त्यामुळे सगळी परळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना खरंच दिली का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष झाल्यानंतर उपनगराध्यक्ष भाजपाचा व्हावा अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र मंत्री पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेसोबत काय डील झाली हे मात्र समजू शकले नाही.

याआधी नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी येथील कार्यक्रमात मी परळी धनंजय मुंडे यांना देऊन टाकली असं विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यानंतर परळी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपनगराध्यक्ष खैसर राजा खान यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे एक प्रकारे पंकजा मुंडेंनी आपल्याच विधानावर शिक्कामोर्तब केल्याचं दिसून आलय.

पंकजा मुंडे यांच्या या निर्णयामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंता आहे. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंसाठी परळी सोडल्याने त्या परळीकडे लक्ष देत नाहीत. यामुळे परळीतील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. पंकजा मुंडे यांनी दिलेला शब्द पाळल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. मात्र, भाजपाचे परळीत नक्कीच पुढे काय भविष्य हा देखील प्रश्न विचारला जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.