अनेकदा तेलकट त्वचा असणाऱ्यांना त्वचेची काळजी घेणे आव्हानात्मक असू शकते. कारण जास्त प्रमाणात तयार होणाऱ्या सेबममुळे (Sebum ) चेहऱ्यावर मुरुमे, ब्लॅकहेड्स येतात. जर तुमचीही त्वचा तेलकट असेल तर योग्य स्किनकेअर रूटीन फॉलो केल्यास तुम्ही तुमची त्वचा फ्रेश आणि चमकदार ठेवू शकता. ( Skincare Routine For Oily Skin )
साफ करणे
दिवसातून कमीत कमी दोनदा ऑइल-बेस्ड फेसवॉशने तुमचा चेहरा स्वच्छ करा. नंतर चेहरा मॉइश्चरायझ करण्यासाठी मिस्लेर वॉटरचा वापर करा.
exfoliate
आठवड्यातून एकदा तुमचा चेहरा एक्सफोलिएट करायला विसरू नका. यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत होते, ओपन पोर्स बंद होतात आणि चेहऱ्यावर सेबम जमा होत नाही.
टोनर
तेलकट त्वचा असल्यास चेहऱ्यासाठी अल्कोहोल-फ्री टोनर वापरा. यामुळे चेहरा कोरडा पडत नाही.
मॉइस्चरायझिंग
अनेकदा तेलकट त्वचा असेल तर मॉइश्चरायझर वापरले जात नाही. मात्र तेलकट त्वचेसाठी मॉइश्चरायझर्स वापरणे आवश्यक आहे, कारण यामुळे त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
सीरम
एका अभ्यासांवरून असे दिसून येते की सीरम त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे तुमच्या स्किनकेअर रूटीनमध्ये सीरमचा वापर करावा. नियासिनमाइड युक्त सीरम तेलकट त्वचेसाठी फायदेशीर असतात.
सनस्क्रीन
तुमच्या त्वचेचे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करण्यासाठी ऑइल-फ्री आणि नॉन-कॉमेडोजेनिक सनस्क्रीन वापरा. तेलकट त्वचा टाळण्यासाठी सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे.