पोलिस उपनिरीक्षकपदी गायकवाड यांची पदोन्नती
esakal January 21, 2026 02:45 AM

वाल्हे, ता. २० : वाल्हे (ता. पुरंदर) येथील सूर्यकांत रघुनाथ गायकवाड यांची ग्रेड पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर पदोन्नती झाली आहे. सध्या ते कापूरहोळ (ता. भोर) महामार्ग वाहतूक पोलिस म्हणून कार्यरत आहेत. शासनातर्फे नुकतीच त्यांना ही बढती जाहीर करण्यात आली असून, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पदोन्नतीचा अधिकृत आदेश दिला आहे. गायकवाड यांनी आपल्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात वालचंदनगर, वडगाव निंबाळकर, बारामती तालुका, सासवड व भोर येथील पोलिस ठाण्यांमध्ये निष्ठेने व प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि जनतेशी समन्वय ठेवून काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सारोळा येथे पोलिस निरीक्षक
हनुमंत पडळकर यांच्या हस्ते गायकवाड यांनी पदोन्नती स्वीकारली. यावेळी सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

06242

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.