मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातील धरमपुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार कालूसिंह ठाकूर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. स्वतःच्या गावातील नागरिकांनी त्यांच्यावर दगडफेक केली आहे. या हल्ल्यात आमदार ठाकूर यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आमदार ठाकूर आपल्या घराजवळील शेतात सुरू असलेले काम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. यावेळी नागरिकांनी त्यांच्याच्या दिशेने दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच धामनोद पोलिस घटनास्थळी पोहोचले. तसेच आमदार ठाकूर यांना धामनोद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
MLA Sangram Jagtap: व्हीजनरी उमेदवार निवडून द्यावेत:आमदार संग्राम जगताप; सुख- दुःखात साथ देणाऱ्यांच्या पाठीशी रहा!यांदर्भात बोलताना पोलीस उपनिरीक्षक नारायण कटारे म्हणाले, आमदार कालूसिंह ठाकूर यांची सिरसोदिया गावात जमीन असून तेथे काम सुरू होते. ते बघण्यासाठी ते तिथे गेलं होते. त्या वेळी शेजाऱ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरु करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Palghar Crime: हिंदू विद्यार्थिनीला जबरदस्तीने पढायला लावला नमाज, वाड्यातील आयडियल काॅलेजमधील धक्कादायक प्रकारया हल्ल्यानंतर आमदार कालूसिंह ठाकूर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मी शेतात उभा होतो. त्यावेळी दोन-तीन जणांनी माझ्यावर दगडफेक केली. हल्ला करण्याऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. ते हल्लेखोर कोण आहेत माहिती नाही. त्यांना हल्ला का केला, हे देखील कळलं नाही, असं त्यांनी सांगितलं. तसेच यापूर्वीदेखील आपल्यावर गोळीबार करण्यात आला होता, अशी माहितीही त्यांनी दिली.