७२व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ आज राज्य संघटनेचे प्रभारी अध्यक्ष गजानन कीर्तीकर यांच्या मान्यतेने व मार्गदर्शना खाली जाहीर करण्यात आला आहे. संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे हे निवडणूक कार्यात व्यस्त असल्याने कीर्तीकर यांना यात लक्ष घालावे लागले.
पुणे ग्रामीणच्या रेखा सावंतकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा, तर मुंबई उपनगर पश्चिमच्या कोमल देवकरकडे उप कर्णधारपद सोपविण्यात आले.
Kabaddi World Cup: भारताच्या लेकींनी नोव्हेंबर महिन्यात जिंकला तिसरा वर्ल्ड कप; कबड्डीमध्येही मिळवले जगज्जेतेपदतेलंगणा येथील गच्ची बोवली बंदिस्त क्रीडा संकुल येथे २७ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत ही स्पर्धा होईल. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन व स्वस्तिक क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली पूर्व येथील सुवर्णा संतोष केणे गार्डन, आयरे रोड येथे या संघाचे सराव शिबिर प्रशिक्षिका मेघाली म्हसकर(कोरगावकर) यांच्या मार्गदर्शना खाली सुरू आहे. या संघासोबत फिजिओ म्हणून सलोनी संकपाळ यांची, तर फिटनेस ट्रेनर म्हणून सायली नागवेकर हिची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संघाच्या निवडीत पारदर्शकता यावी म्हणून या निवडीचे थेट प्रक्षेपण करण्यात येऊन ते कबड्डी रसिकांना दाखविण्यात आले. मीनल पालांडे, वीणा शेलटकर, मेघाली कोरगावकर यांच्या निवड समितीने या संघाची निवड केली.
या तिन्ही सदस्य शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू आहेत. हा संघ दिनांक २६ जानेवारी रोजी पहाटे तपोवन एक्स्प्रेसने स्पर्धेकरिता रवाना होईल.
Jr. State Kabaddi Selection Trials 2025: ठाणे ग्रामीण कुमार अन् पालघर संघ कुमारी विभागात विजेता निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे.१) रेखा सावंत (कर्णधार) पुणे ग्रामीण, २) कोमल देवकर (उपकर्णधार), मुंबई उपनगर पश्चिम, ३) प्रतीक्षा तांडेल, मुंबई शहर पश्चिम, ४) समृद्धी मोहिते, मुंबई उपनगर पूर्व, ५) पौर्णिमा जेधे, मुंबई शहर पूर्व, ६) ज्युली मिस्किटा, पालघर, ७) साक्षी सावंत, मुंबई शहर पूर्व, ८) समरिन बुरोंडकर, रत्नागिरी, ९) गार्गी साखरे, सातारा, १०) आम्रपाली गलांडे, पुणे शहर, ११) निकिता पडवळ, पुणे ग्रामीण, १२) याशिका पुजारी, मुंबई उपनगर पूर्व, १३) माधुरी गवंडी, ठाणे शहर, १४) संजना भोईर, पालघर.
राखीव खेळाडू - १) हर्षा शेट्टी, पुणे शहर, २) तसलिन बुरोंडकर, रत्नागिरी, ३) अंकिता चव्हाण, पुणे शहर.
प्रशिक्षिका - मेघाली म्हसकर.