अभिनेत्रीने घेतला 'देवमाणूस' मालिकेचा निरोप; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'एका सुरुवातीचा शेवट...'
esakal January 21, 2026 08:45 PM

मालिका आणि टीव्ही हे असं माध्यम आहे जे रातोरात एखाद्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवते. या माध्यमाने अनेकांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. सध्या छोट्या पडद्यावर नेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतायत तर काही जुन्याच मालिका अजूनही टीआरपी मध्ये पहिल्या १० मध्ये ठाण मांडून बसल्यात. अशीच एक मालिका जी प्रेक्षकांची अत्यंत आवडती आहे. ती म्हणजे 'देवमाणूस' सध्या झी मराठीवर 'देवमाणूस' या मालिकेचा मधला अध्याय सुरू आहे. या मालिकेचा प्रेक्षकवर्गही वेगळा आहे. आता या मालिकेतून एका एक्झिट होणार आहे.

मालिकेतील गोपाळ हा पैशांसाठी स्त्रियांचे खून करतो. गावातल्या सुंदर पण स्वतःच्या घरात खुश नसलेल्या स्त्रियांना तो गळाला लावतो आणि त्यांना फसवतो. लग्न करण्याचे वचन देतो. आपण पळून जाऊ पण भविष्यासाठी तुझ्याकडे दागिने आणि पैसे घेऊन ये असं त्यांना सांगतो. ज्या स्त्रिया त्याच्यावरच्या विश्वासापायी त्याच्यासोबत येतात त्यांना तो त्यांची संपत्ती स्वतःकडे ठेवतो. आता या मालिकेत गोपालसोबतच लालीदेखील सगळ्यांचे खून करायला लागली आहे. आता या मालिकेत आर्या म्हणजे इन्स्पेक्टर जामकरच्या बहिणीची हत्या झालीये. त्यामुले मालिकेतील या पात्राचा प्रवास आता संपलाय.

View this post on Instagram

A post shared by Simran Khedkar (@kadambariiiiiiii)