गोंदिया : आॅनलाइन फसवणुकीचे प्रकरण समोर येत असतानाच आता बीएएमएसच्या अॅडमिशनकरिता तब्बल पाच लाख रुपयांनी एका व्यक्तीची फसवणूक झाल्याचे प्रकरण तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द येथून समोर आले आहे.
या प्रकरणी तिरोडा पोलिसांनी आरोपी दोन जणांवर सोमवारी (ता. १९) रात्री सव्वानऊच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे. चांदोरी खुर्द येथील फिर्यादी हरिश्चंद्र मोडकू वैद्य (वय ५०) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, यातील आरोपी फागूलाल शिवाजी भगत (वय ५३) व आशीष फागूलाल भगत (वय २४, दोघेही रा. बाघोली, ता. तिरोडा) यांनी आॅगस्ट २०२४ मध्ये हरिश्चंद्र वैद्य यांचा मुलगा यश याची मंजीरादेवी मेडीकल काॅलेज रिसर्च सेंटर उत्तरकाशी (उत्तराखंड) येथे बीएएमएसकरिता अॅडमिशन करून देतो, असे आमिष दाखविले व अॅडमिशनकरिता पाच लाख रुपयांची मागणी केली.
त्यानुसार, हरिश्चंद्र वैद्य यांनी फागूलाल भगत याचा मुलगा आशीष याच्या मोबाइल क्रमांकावर फोन पे द्वारे २३ आॅगस्ट २०२४ रोजी ५० हजार रुपये व परत ५० हजार रुपये पाठविले. २९ आॅगस्ट २०२४ रोजी एक लाख रुपये, ९ सप्टेंबर रोजी एक लाख रुपये, तसेच १८ सप्टेंबर रोजी दोन लाख रुपये असे एकूण पाच लाख रुपये टप्प्याटप्प्याने दिले.
परंतु, दोन्ही आरोपींनी हरिश्चंद्र वैद्य यांच्या मुलाची बीएएमएस काॅलेजला एडमिशन केली नाही. मध्यंतरी हरिश्चंद्र वैद्य यांनी मुलाच्या एडमिशनसंबंधाने आरोपी दोघांनाही विचारपूस करून पैसे परत मागितले असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
Fake Call Center Scam: अमेरिकन नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणारा फारुकी अखेर जेरबंद; ६० लाखांचा मुद्देमाल जप्तदरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हरिश्चंद्र वैद्य यांनी सोमवारी (ता. १९) रात्री सव्वानऊच्या सुमारास तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कवडे करीत आहेत.